विखे म्हणतात, राजकारणात काहीही होऊ शकतं

पेमराज सारडा महाविद्यालयातील कार्यक्रमापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशीसंवाद साधला.
radhakrishna vikhe patil.jpg
radhakrishna vikhe patil.jpg

अहमदनगर : हिंद सेवा मंडळाच्या पेमराज सारडा महाविद्यालया मध्ये कनिष्ठ महाविद्यालयासाठी नव्याने उभारलेल्या इमारतीचे आज (शनिवार) माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व भाजपचे जेष्ठ नेते हेरंभ औटी यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन झाले. Vikhe says, anything can happen in politics

यावेळी माजी आमदार चंद्रशेखर कदम व भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, संस्थेचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, सचिव संजय जोशी, विद्यालयाचे चेअरमन अॅड.अनंत फडणीस, जेष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाल सारडा, प्राचार्य डॉ.राजेंद्र शिंदे, उपप्राचार्य डॉ.मंगला भोसले, डॉ.मिलिंद देशपांडे, प्रबंधक अशोक असेरी, पर्यावेक्षक सुजित कुमावत आदी उपस्थित होते.

हेही वाचा...

या कार्यक्रमा पूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री अब्दुल सत्तार यांनी नगर व नाशिकने पाणी अडविल्याचे सांगितले होते. यावर विचाले असता विखे पाटील म्हणाले, नगर व नाशिकने पाणी अडविले आहे. हे विधान अपुऱ्या माहितीच्या आधारावर आहे. वास्तविक सर्वांना कल्पना आहे. वरील धरण क्षेत्रात पाऊस झाला तर आपोआप त्याचा परिणाम जायकवाडी भरण्यात होतो. त्यांनी विनाकारण प्रादेशिक वाद निर्माण करणे अयोग्य आहे.

बाळासाहेब थोरात यांनी काल भाजपचे काहीजण महाविकास आघाडीत येण्यासाठी उत्सूक असल्याचे म्हटले होते. यावर विखे म्हणाले, त्यांनी त्यांच्याच नेत्याचे अवमूल्यन केले आहे. सत्तेत ते लाचार म्हणून टिकून राहतात. त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण केले पाहिजे. पण दुर्दैवाने काँग्रेस पक्षाची अशी अवस्था आहे की, पक्षाचे हित पाहण्यापेक्षा व्यक्तिगत हीत पाहण्यात मंत्र्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे. मुंगेरीलालचे स्वप्न त्यांनी पाहू नये.

हेही वाचा...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या विधानावर ते म्हणाले, राजकारणात काहीही होऊ शकते. महाविकास आघाडीची जी विशिष्ट मोट बांधली गेली आहे. ती सत्तेसाठी बांधले गेलेली आहे. भाजप-शिवसेनेने एकत्र 25-30 वर्षे काम केले आहे. त्यामुळे सर्व एकत्र येत असतील तर त्यांचे स्वागतच केले पाहिजे, असे विखे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com