कर्जत-जामखेडच्या रस्त्यांसाठी रोहित पवारांचे थेट गडकरींना साकडे

आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांत आठ केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन त्यांना मागणीचे निवेदन देत चर्चा केली.
कर्जत-जामखेडच्या रस्त्यांसाठी रोहित पवारांचे थेट गडकरींना साकडे
rohit dada pawar.jpg

जामखेड : विधानसभेच्या निवडणुकीतील विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते आमदार रोहित पवार हे कर्जत-जामखेडच्या विकासासाठी निधी आणत आहेत. त्यातून नवनवीन योजना मतदार संघात राबविल्या जात आहेत. या विकासाच्या रथाला आणखी गती मिळावी तसेच मतदार संघात पायभूत सुविधांचा विकास व्हावा यासाठी यासाठी आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांत आठ केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन त्यांना मागणीचे निवेदन देत चर्चा केली.

आमदार पवार यांनी काल (मंगळवार) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार व अल्पसंख्यांक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांची तर आज केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीराज सिंह, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत चर्चा केली.

हेही वाचा...

कर्जत व जामखेड तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गांची सध्या दुरवस्ता झाली आहे. यातील एक रस्ता पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांचा मार्ग आहे. ही महामार्गे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहेत. त्यामुळे हे महामार्ग होण्यासाठी केंद्राकडून हलचाली होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने आज आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट महत्त्वाची ठरणार आहे.  

कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या नगर-सोलापूर आणि श्रीगोंदा-जामखेड या दोन महामार्गांच्या कामाला मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन आभार मानले, तसेच या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी वेळ देण्याची विनंतीही केली.
 
शिवाय, कर्जत-जामखेड मतदारसंघातील इतर रस्त्यांची कामे आणि पैठण-पंढरपूर हा पालखी मार्ग खर्ड्यापासून पुढे पंढरपूरपर्यंत पूर्ण करण्याची विनंतीही विविध पालखी सोहळा प्रमुखांच्यावतीने आमदार पवार यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे केली. अहमदनगर जिल्ह्यातील रस्त्यांचा नकाशा पाहून त्यावरही यावेळी चर्चा झाली. 

हेही वाचा...

जामखेडमध्ये वाहन चालक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मागणीही केली. यावर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. करमाळा मतदारसंघातील जातेगाव ते टेंभुर्णी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे हस्तांतरीत करण्याबाबत आमदार संजय शिंदे हे प्रयत्न करत आहेत. या विषयावरही आमदार रोहित पवार यांनी गडकरींशी चर्चा केली.

या भेटींतून कर्जत व जामखेड तालुक्यांतील रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. त्यामुळे ही भेट या दोन तालुक्यातील नागरिकांसाठी फायद्याची ठरणार आहे. रस्ते चांगले नसल्याने या दोन तालुक्यांत महत्त्वाचे महामार्ग जाऊनही दळणवळणाच्या साधनांचा व पायाभूत सुविधांचा विकास झालेला नव्हता. या दोन्ही तालुक्यांत रस्ते करून विकासाचा महामार्ग खुला करण्याचा आमदार रोहित पवार यांचा प्रयत्न आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in