कर्डिले रात्रीतून उपमुख्यमंत्री पवार यांच्या पाया पडून आले..

बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे व संचालक मंडळाने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन केवळ जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केलेले हे बिनबुडाचे आरोप होत असल्याचे सांगितले होते.
कर्डिले रात्रीतून उपमुख्यमंत्री पवार यांच्या पाया पडून आले..
nagar taluka krushi utpanna bazar samiti.jpg

नगर तालुका : नगर तालुक्यातील कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्त्वाखालील संचालक मंडळाची सत्ता आहे. या संचालक मंडळाला महाविकास आघाडीचा त्यातही शिवसेनेचा जोरदार विरोध आहे. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संदेश कार्ले यांनी गुरुवारी (ता. 9) पत्रकार परिषद घेत बाजार समितीच्या संचालक मंडळावर हल्लाबोल केला होता. या संचालक मंडळाविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत, असा दावा नगर तालुका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. हा अपहार मोठा असल्याचा दावा संदेश कार्ले यांनी केला होता. यावर बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे व संचालक मंडळाने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन केवळ जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केलेले हे बिनबुडाचे आरोप होत असल्याचे सांगितले होते.


आज पुन्हा नगर तालुका महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत बाजार समितीच्या संचालकांवर आरोपाच्या फैरी झालल्या. या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संदेश कार्ले, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, बाळासाहेब हराळ, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संपत म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ, संदीप गुंड, प्रवीण कोकाटे, रामदास भोर, रवींद्र भापकर आदी उपस्थित होते. 

हेही वाचा...


यावेळी आरोपांना उत्तर देताना संदेश कार्ले म्हणाले, 2016 ते 2018 या लेखा परिक्षण अहवालाचे तक्रारदार आम्ही होतो. या लेखा परिक्षण अहवालाची एक प्रत तक्रारदाराला दिली जाते. सत्ताधारी संचालक मात्र मंत्र्यांची नावे घेऊन खोटे आरोप करत आहात. विधान परिषदेच्या पाकीट वाटपात तुम्ही कोठे होता हे तपासून पहा. त्यावेळी तुमचे नेतृत्त्व करणारे तत्कालीन आमदार शिवाजी कर्डिले यांनी सत्तेचा दुरउपयोग करून पणन मंडळाकडून लेखा परिक्षणावर स्थगिती आणली होती. 

बाजार समिती ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची आहे. येत्या 29 तारखेला या लेखा परिक्षण अहवालाचा निकाल आहे. त्यावेळी सर्व चित्र स्पष्ट होईल. बाजार समितीला नोटीस आल्यावर तुमचे नेते कर्डिले रात्रीतून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पाया पडून आले. तुमचे संचालक सांगतात आमच्या तोंडाकडे पाहून तरी असे आरोप करू नका. 

आमच्या निष्ठे विषयी या चोरांनी सांगू नये. शिवसेना व शिवसैनिक आदेश माननारे आहे. तुमच्या सारखे नेत्यांचे धुणे धुणारे नाहीत. रस्त्याने जाताना भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड मारावाच लागतो, असा आरोप संदेश कार्ले यांनी केला.

हेही वाचा...

बाळासाहेब हराळ म्हणाले, कर्डिले आमदार असताना सूर्यवंशी यांच्या चौकशी समितीने हा अहवाल सादर केला आहे. आम्ही कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही. व्याह्यासाठी तुमच्या नेत्याने पक्ष विरोधी कारवाया करून तुमच्या नेत्याने पाठीत खंजीर खुपसला आहे. 2009 विधानसभेच्या वेळी प्रा. शशिकांत गाडे यांनी केलेल्या उपकाराची जाण विसरले आहेत. बाजार समितीत अनधिकृत बांधकामे, गाळे केली नसतील तर ते अहवालात आले कसे, बाजार समितीतील जागा कशा विकल्या हे जाहीरपणे सांगावे. बाजार समितीत जे काही विकायचे राहिले असेल ते विकण्यासाठी तुम्हाला बाजार समिती बिनविरोध देऊन टाकू. सहाव्या वेतन आयोगाचे कर्मचाऱ्यांचे वेतन तुम्ही गायब केले. नेप्ती उपबाजार समितीतील डाळिंब शेडची जागा 80 लाख रूपयांना विकली असल्याचा आरोपही हराळ यांनी केला. 

दिसली जमीन की विक
प्रताप शेळके यांनी सांगितले की, बाजार समितीत दिसली जमीन की विक, हा धंदा बंद करा. स्वच्छतागृहाच्या जागेवर गाळा बांधून तोही तुम्ही विकला. सर्व बाजार समिती नेप्तीकडे वळवून शहारातील मोक्याच्या ठिकाणी असलेली जागा मोकळी करून विकण्याचा डाव यांनी मांडला आहे. बाजार समिती राहिली नाही तर तालुक्यातील शेतकऱ्यांना भविष्यात चहाच्या टपरीवर बसून व्यवहार करावे लागतील. तालुक्यातील शेतकऱ्यांनी या विरोधात लढा उभारायला हवा. बाजार समितीला कै. दादा पाटील शेळके यांचे नाव देऊन तुम्ही त्यांची स्वप्ने पायदळी तुडवीत आहेत. आगामी निवडणुकीत मतदारांनी अशा लोकांच्या हाती सत्ता देऊ नये असे आवाहन शेळके यांनी केले आहे.


आता गुद्द्यावरून मुद्द्यावर या
आम्ही विचारलेले मुद्दे सोडून गुद्द्यांची भाषा करणाऱ्या संचालकांनी मुद्द्यावर येऊन चर्चा करावी. माझा पक्ष कोणता हे विचारणारे दिवसा भाजप बरोबर तर रात्री इतर पक्षांशी हात मिळवणी करत फिरणारे आहेत, असा टोलाही बाळासाहेब हराळ यांनी लगावला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in