बदली झाली तरी तहसीलदार देवरेंच्या विरोधात तक्रारींचा सपाटा

आमदार लंकेंवर भाजपकडून आरोप करण्यात आले होते. देवरे यांच्या विरोधात वातावरण तापले होते.
बदली झाली तरी तहसीलदार देवरेंच्या विरोधात तक्रारींचा सपाटा
devre.jpg

अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यात त्यांनी अप्रत्यक्षपणे आमदार नीलेश लंके व जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरले होते. या भावनिक क्लिपमुळे राज्यातील राजकारण तापले होते.

आमदार लंकेंवर भाजपकडून आरोप करण्यात आले होते. देवरे यांच्या विरोधात वातावरण तापले होते. देवरे यांच्या संदर्भात भ्रष्टाचाराचे आरोपही झाले होते त्याचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी विभागीय आयुक्तांना पाठविला होता. तसेच क्लिपची चौकशीचा अहवालही वरिष्ठांना पाठविला होता. त्यानुसार देवरे यांच्या बदलीचा आदेश आज राज्य शासनाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांना काढला आहे. त्यानुसार देवरे यांची जळगाव मधील संजय गांधी निराधार योजना कार्यालय विभागात बदली करण्यात आली आहे. तरीही त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी मात्र थांबलेली नाही.

ही वाचा...

तहसीलदार ज्योती देवरे यांनी त्यांच्या उत्पन्ना पेक्षा जास्त संपत्ती गोळा केली आहे. तसेच त्यांनी पदाचा गैरवापर करत भ्रष्टाचार केला आहे. या भ्रष्टाचाराची तक्रार कारभारी भाऊसाहेब पोटघन यांनी लाचलुचपतचे पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकरांकडे केली आहे. या वेळी पोटघन यांच्या समवेत प्रसिद्ध विधी तज्ज्ञ अॅड. असीम सरोदे उपस्थित होते. 

तक्रार दाखल झाल्यावर अॅड. सरोदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, देवरे यांनी त्यांच्या कार्यालयीन कामकाजामध्ये पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचे आरोप सातत्याने होत आहेत. त्याला अनेक पदार आहेत. या भ्रष्टाचारात अनेक जण सहभागी असल्याची शक्यता आहे. अशी तक्रार पोटघन यांनी दिली. यात मुख्यतः आधार जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी समितीचा अहवाल आहे.

हेही वाचा...

वाळूचा उपसा, जमिनीचा अकृषक वापर रुपांतरीत करून देणे अशा अनेक ठिकाणी त्यांनी भ्रष्टाचार केला आहे. त्यांनी मोठी वाहने, जेसीबी, डंबर, ट्रॅक्टर अशी वाहने जप्त केली. त्याबद्दल कोणतेही शुल्क आकारले नाहीत. त्यांची कारवाई संशयास्पद आहे. त्यांनी कोणतेही तडजोड शुल्क शासनाकडे जमा केले नाहीत. जळगाव जिल्ह्यात या पूर्वी त्या होत्या. तेथेही त्यांनी जमिनीचे भ्रष्टाचार केले आहेत असे अहवालात म्हटले आहे. मोठ्या प्रमाणात त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे दिसत आहे. त्यामुळे या भ्रष्टाचाराची
चौकशी व्हावी अशी मागणी लोक करत आहेत. त्यातीलच पोटघन यांनी आज ही तक्रार दाखल केली आहे.

ज्योती देवरे यांच्या सारख्या प्रवृत्ती विरोधात हा अर्ज आहे. देवरे यांनी पुढील काळात आपल्या कार्यपद्धतीत बदल करावा. व भ्रष्टाचारपूर्ण व्यवहार थांबवावा. महिलांना कामाच्या स्थळी अनेक प्रकारचे दबाव सहन करावे लागतात. तसा जर त्यांच्यावर अन्याय होत असेल तर मी स्वतः वकील म्हणून त्यांच्या बाजूने आहे. पण भ्रष्टाचाराची पाठराखण करू शकत नाही.

देवरे यांनी जो ऑडिओ प्रसारीत केला. यातून भावनिकतेचे कवच आपल्या स्वतः भोवती निर्माण करून चौकशीतून आपली सुटका व्हावी अशा प्रकारचा अभिनय ऑडिओच्या माध्यमातून करणे हा सुद्धा गैरफायदा घेण्याचा प्रकार आहे. यातून कामाच्या ठिकाणी ज्या महिलांचे लैगिक शोषण अथवा अत्याचार होतात. त्याचे महत्त्व कमी होते. त्यांनी कायद्याच्या प्रक्रियेचा कोणताही वापर भावनिक पद्धतीने करू नये. चुका टाळल्यास आयुष्याचा मोठा कालखंड त्या चांगल्या अधिकारी म्हणून राहू शकतील, असेही अॅड. असीम सरोदे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in