मोदी, केजरीवाल आणि बेदींवर भडकले अण्णा हजारे

आज हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे कार्यकर्त्यांचे राष्ट्रीय शिबिर घेतले होते.
मोदी, केजरीवाल आणि बेदींवर भडकले अण्णा हजारे
anna hajare2.jpg

राळेगणसिद्धी : राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे करत आहेत. या संदर्भात त्यांनी राज्य सरकारला इशारा देणारे महत्त्वाचे वक्तव्य करणारे प्रसिध्दीपत्रक अण्णा हजारे यांनी काल काढले आहे. त्यानंतर शुक्रवारी अण्णा हजारे यांनी लोकायुक्त कायदा लागू करण्यासाठी ठाकरे सरकारला तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे कार्यकर्त्यांचे राष्ट्रीय शिबिर घेतले होते.

या शिबिरात कार्यकर्त्यांना संबोधित करताना अण्णा हजारे म्हणाले, देशाला 70 वर्षे स्वातंत्र्य मिळून झाले आहेत मात्र त्यानंतरही देशाची अवस्था ठीक नाही. स्वातंत्र्य मिळण्याअगोदर देशाला लुटणारे बाहेरील होते. आज देशाला लुटणारे देशातीलच लोक आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात चारित्र्यशील आणि सामाजिक दृष्टीकोन ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांचे राष्ट्रीय संघटन होणे ही काळाची गरज आहे. 

हेही वाचा...

लोकायुक्त व लोकपाल हे अनुक्रमे मुख्यमंत्री व पंतप्रधान ठरवितात. त्यामुळे ते जे म्हणतील त्या प्रमाणेच ते वागत आहेत. लोकायुक्त व लोकपाल कायद्यानुसार ही पदे असायला हवीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकपालला कमजोर केले. लोकपालसाठी आम्ही मोठे आंदोलन केले होते. आता लोकायुक्तसाठी राज्यात आंदोलन करायचे आहे. कार्यकर्त्यांना विनंती आहे की, प्रत्येक राज्यात संघटन उभे करून लोकायुक्त आणा. म्हणजे समस्या सुटतील. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आमचे संघटन आहे. 

पक्ष व पार्टींकडून देशाचे उज्ज्वल भवितव्य नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, किरण बेदी यांना मी म्हणालो होतो, 2011ला संघटन व आमच्यावर लोकांनी विश्वास केला होता. राजकीय व्यक्तींवर जनशक्तीच दबाव निर्माण करण्यात लोकशाहीचा विजय आहे, असे मी सांगत होतो. मात्र एका रात्रीत केजरीवालांच्या डोक्यात मुख्यमंत्र्यांचे भूत घुसले. देश वाचवायचा असेल तर संघटनच करावे लागेल. संघटनमध्ये संख्यात्मते पेक्षा गुणात्मकता हवी. चांगले गुणात्मक लोक संघटनेत हवेत.

हेही वाचा...

स्वतंत्र्याचा अर्थ स्वैराचार लावणारे लोक जसे नरेंद्र मोदींना रोखायला एकच उपाय आहे तो म्हणजे जनशक्तीचा दबाव. सरकार पाडण्याची ताकाद जोपर्यंत जनतेत येत नाही तो पर्यंत बदल होणार नाही. देशातील जनता जागी झाली तर केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकारही पडू शकते. 
 
पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा याच मागे सर्व राजकीय पक्ष पळत आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षापासून देशाला उज्ज्वल भविष्य नाही. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा घेऊन अनेक राजकीय पक्ष काम करीत आहेत. त्यांच्यावर जनतेने दबाव निर्माण करावा की र कोणतही सरकार पडेल. याशिवाय देशाला वाचविण्यासाठी दुसरा मार्ग नाही. 

यावेळी देशभरातील 14 राज्यातील 86 कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय शिबिरात सहभाग घेतला होता. जगदीश प्रसाद सोलंकी (दिल्ली), रामपाल जाट (राजस्थान) भोपालसिंह चौधरी (उत्तराखंड), कल्पना इनामदार (मुंबई) योगेंद्र पारीख (राजस्थान), अशोक सब्बन (महाराष्ट्र), दशरथ भाई (राजस्थान), विकल पचार (हरियाणा), विष्णू प्रसाद बराल (आसाम), दयानंद पाटील (कर्नाटक) प्रविण भारतीय (उत्तर प्रदेश), अशोक मालिक (हरियाणा) आदींसह देशभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.  

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला माझा पाठिंबा
अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन करीत आहे. 23 मार्च 2018 आणि 30 जानेवारी 2019 रोजी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर माझी आंदोलने झाली आहेत. दिल्ली येथे मागील 9 महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या सुरु असलेल्या आंदोलनाला माझा पाठींबा आहे. त्यांच्या पाठिंब्यासाठी एक दिवसाचे उपोषण केले. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अजिबात गंभीर नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी सी 2 + 50 याप्रमाणे एमएसपी लागू करायला पाहिजे. यासाठी केंद्र सरकारने एक उच्चाधिकार समिती नेमण्याचे आश्वासन दिले आहे.

 
राजकीय पक्षांकडून या देशाला उज्ज्वल भविष्य नाही; कारण पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा अशा दुष्टचक्रात सगळेच पक्ष अडकले आहेत. मग भारतीय जनता पक्ष असो की काँग्रेस किंवा इतर राजकीय पक्ष. देशात बदल घडवायचे असेल तर सरकार कोणत्याही पक्षाचे असो त्यावर जनतेचा हा दबाव असलाच पाहिजे. 2011 साली झालेल्या लोकपाल आंदोलनात हाच विचार करून  जनतेचा दबाव गट तयार केला होता. मात्र नंतर अनेक लोकांच्या मनात राजकीय महत्त्वाकांक्षा निर्माण झाल्याने आमची टीम विखुरली गेली. काही लोक मुख्यमंत्री तर काही लोक राज्यपाल बनले. यामध्ये देशाचे खूप मोठे नुकसान झाले.
- अण्णा हजारे, जेष्ठ समाजसेवक

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in