राष्ट्रवादीच्या विस्तारासाठी नीलेश लंके विखेंच्या शिवारात

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्ष संघटना वाढविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
राष्ट्रवादीच्या विस्तारासाठी नीलेश लंके विखेंच्या शिवारात
nilesh lanke.jpg

श्रीरामपूर : अहमदनगर जिल्ह्यात आगामी सहा महिन्यांत सलग निवडणुका आहेत. यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्था व सहकार संस्थांचाही समावेश आहे. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्ष संघटना वाढविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. Nilesh Lanke in Vikhen's territory for NCP expansion

त्या दृष्टीने श्रीरामपूर येथील काँग्रेस भवनमध्ये आज (गुरुवारी) सायंकाळी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यासह पक्ष प्रवेश सोहळा झाला. याप्रसंगी आमदार नीलेश लंके, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, सुरेश निमसे, भाऊसाहेब डोळस, जयश्री जगताप, अर्चना पानसरे यांच्यासह आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी 200 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

हेही वाचा...

उपस्थितांना नीलेश लंके यांनी संबोधित केले. ते म्हणाले, युवक देशासह राज्याची दिशा बदलू शकतो, आजच्या युवकांचा ओढा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. केवळ गावागावांत आणि चौकचौकात बॅनरबाजी करणे म्हणजे, पक्ष सर्वत्र पोचला असे नव्हे, तर पक्षाच्या माध्यमातून गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत मदतकार्य पोचले पाहिजे. आपण केलेल्या मदतकार्यातून पक्ष प्रत्येकाच्या मनामनात रुजवा. राष्ट्रवादी पक्ष हा केवळ राजकीय पक्ष नव्हे, तर जेष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांचे कुटूंब आहे.

राज्यासह देशावर ज्या-ज्या वेळी संकटे आली. त्या-त्या वेळी जेष्ठ नेते शरद पवार हे मदत कार्यासाठी धावून गेले. किल्लारीचा भुकंपासह अनेक मोठ्या संकटात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यांची प्रेरणा घेवून राष्ट्रवादी पक्षातील प्रत्येकजण जनतेसाठी काम करतो. तसेच जो माणुस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहवासात राहिला. तो नेटाने प्रशासन चालवू शकतो. 

हेही वाचा...

पक्षातील पदाच्या बळावर चमकोगिरी करणारी नेते मंडळी तेव्हाच लक्षात येतात. त्यामुळे संघटनेचे काम करणे अधिक महत्वाचे असते. प्रत्येकांच्या सुखः दुखात सहभागी होवून मदतकार्य करा. प्रत्येकाला आधार दिला तर आपला पक्ष मनामनात रुजतो. आपले महत्व वाढविण्यापेक्षा आपल्या कार्यातून पदाचे महत्व वाढवा. मेळाव्यात आलेला प्रत्येक जण राष्ट्रवादीच्या विचाराचा असून राष्ट्रवादी परिवार तुमच्यासोबत असल्याचा विश्वास आमदार निलेश लंके यांनी कार्यकर्त्यांना दिला.

कार्यक्रमात प्रारंभी प्रणिता चव्हाण यांनी मान्यवरांचे स्वागत केले. तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे यांनी प्रास्तविक केले. शहराध्यक्ष लकी सेठी व नगरसेवक राजेंद्र पवार यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यात आमदार लंके यांनी युवा कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची सूचना नगराध्यक्षा आदिक यांनी मांडली. आमदार लंके यांच्या हस्ते नुतन पदाधिकाऱ्यांना कार्यकारणी निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.

Edited By - Amit Awari

Related Stories

No stories found.