आमदार संग्राम जगतापांनी घेतली आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांची भेट

आज किरण काळे यांच्यासह आठ ते दहा जणांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात विनयभंग, बळजबरीने कार्यालयात प्रवेश करून दमदाटी करणे या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
sangram bhaiyya jagatap.jpg
sangram bhaiyya jagatap.jpg

अहमदनगर : अहमदनगर एमआयडीसीमधील उद्योजकांशी शनिवारी (ता. 28) व रविवारी (ता. 29) महाराष्ट्रातील उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी चर्चा केली होती. त्यावेळी आमदार संग्राम जगताप हेही उपस्थित होते. आमदार संग्राम जगताप यांनीच आदिती तटकरे यांना आमंत्रित केले होते.

राज्यमंत्री तटकरे अहमदनगर दौऱ्यावर येण्यापूर्वीच काँग्रेसचे अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी महसूल मंत्र्यांसह राज्याच्या उद्योग मंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळे अहमदनगर एमआयडीसीतील राजकारण तापणार यांची दाट शक्यता होती

हेही वाचा...

तटकरे यांचा दौरा झाल्यावर काल (ता. 2) किरण काळे यांनी अचानक एमआयडीसीतील आमदार संग्राम जगताप यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या आयटी सेंटरला भेट देऊन गंभीर आरोप केले होते.  तसेच काही फोटोही सोशल मीडियावर टाकले होते.

त्यानंतर आज किरण काळे यांच्यासह आठ ते दहा जणांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात विनयभंग, बळजबरीने कार्यालयात प्रवेश करून दमदाटी करणे या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात किरण काळे यांनी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषद त्यांनी आयटी सेंटरला भेट दिलेल्याचा व्हिडिओच दाखवला. तसेच आमदार संग्राम जगताप, त्यांचे कार्यकर्ते व एमआयडीसीतील आयटी पार्कवर गंभीर आरोप केले. 

किरण काळे यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनीही पत्रकार परिषद घेत त्यांच्या आरोपांचे खंडण केले. तसेच आपली बाजू मांडली. आज दिवसभर शहरात काळे-जगताप वादाची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा...

आज सायंकाळी आमदार संग्राम जगताप यांनी एमआयडीसीतील आयटी पार्कला भेट दिली. तसेच तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले की, काल (ता. 2) काही गुंड प्रवृत्तीच्या आठ ते दहा लोकांनी एमआयडीसी येथील आयटी पार्क मध्ये घुसून त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना दमबाजी केल्याचा प्रकार केला त्यामुळे या घटनेने तेथील कर्मचारी भयभीत झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी आयटी पार्क येथे जाऊन कर्मचाऱ्यांची या घटनेबाबतची विचारपूस करून त्यांना धीर व आधार देण्याचे काम केले. यापुढील काळातही आपण सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन चांगले काम करावे यापुढील काळातही या पेक्षा अधिक कंपन्या आयटी पार्कमध्ये आणण्यासाठी प्रयत्न चालू आहे असे कर्मचाऱ्यांन समवेत संवाद साधताना आमदार जगताप यांनी स्पष्ट केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com