पब्लिसीटीस्टंटला नव्हे मी शहर विकासाला महत्त्व देतो - आमदार संग्राम जगताप

किरण काळे यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनीही पत्रकार परिषद घेत त्यांच्या आरोपांचे खंडण केले.
sangram jagtap.jpg
sangram jagtap.jpg

अहमदनगर : महाराष्ट्राच्या उद्योग राज्य मंत्री आदिती तटकरे यांचा दौरा झाल्यावर काल (ता. 2) किरण काळे यांनी अचानक एमआयडीसीतील आमदार संग्राम जगताप यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या आयटी सेंटरला भेट देऊन गंभीर आरोप केले होते.  तसेच काही फोटोही सोशल मीडियावर टाकले होते.

त्यानंतर आज किरण काळे यांच्यासह आठ ते दहा जणांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात विनयभंग, बळजबरीने कार्यालयात प्रवेश करून दमदाटी करणे या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात किरण काळे यांनी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषद त्यांनी आयटी सेंटरला भेट दिलेल्याचा व्हिडिओच दाखवला. तसेच आमदार संग्राम जगताप, त्यांचे कार्यकर्ते व एमआयडीसीतील आयटी पार्कवर गंभीर आरोप केले. 

हेही वाचा...

किरण काळे यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनीही पत्रकार परिषद घेत त्यांच्या आरोपांचे खंडण केले. तसेच आपली बाजू मांडली. आमदार संग्राम जगताप म्हणाले, किरण काळे हे सातत्याने आमच्यावर आरोप करत असतात. त्यांच्या आरोपाला नगरकर कोणत्याही प्रकारची भीक घालत नाही. आमच्या सारख्या लोक प्रतिनिधींवर आरोप करायचे व त्यातून प्रसिद्धी मिळवायची हा त्यांचा अजेंडा आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपांना उत्तर देणे आम्हाला महत्त्वाचे वाटत नाही. पब्लिसीटीस्टंटला नव्हे मी शहर विकासाला महत्त्व देतो.

आयटी पार्कमध्ये काल जो प्रकार झाला. त्यामुळे आयटी पार्कमध्ये भीतीचे वातावरण आहे. आयटीपार्कमधील लोकांचे मनोधैर्य खच्ची होऊ नये यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतली. पूर्वी अहमदनगर एकमेकांवर आरोप केले तर मते मिळतील अशी परिस्थिती होती. आता तशी परिस्थिती नाही. कामे करणाऱ्यांनाच जनता मत देते. त्यामुळे ज्यांचे निवडणुकांत अनामत रकमा जप्त होतात. त्यांच्याना काय महत्त्व द्यायचे.

हेही वाचा...

आयटी पार्कचा विषय आल्यामुळे बोलावे लागत आहे. 2019 पर्यंत शहरात एमआयडीसीत असलेले आयटी पार्क बंद होते. 2016पासून प्रयत्न केल्यावर ते सुरू करण्यात यश आले. तेथे आलेल्या कंपन्या या स्टार्टअप कंपन्या आहेत. त्यामधून शहरा बाहेर रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांना शहरातच रोजगार देण्याचा प्रयत्न आहे. लॉकडाउन लागले नसते तर तेथे मोठ्या संख्येत युवक रोजगार करत असताना दिसले असते. पण आम्हाला अभिमान वाटतो की, लॉकडाउन काळातही कोणाचा रोजगार तेथे गेला नाही. 

भविष्यात पुण्याच्या खालोखाल अहमदनगरचे आयटी सेक्टरमध्ये नाव व्हावे असा आमचा प्रयत्न आहे. त्यात कोणी खोडा घालू नये. कोणाचे हात बांधलेले नाहीत. तेही शहरात कोठेही आयटी कंपन्या सुरू करून लोकांना रोजगार देऊ शकतात. अहमदनगर शहरातील युवकांना रोजगार कसा मिळेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवा, असे आमदार संग्राम जगताप यांना स्पष्ट केले.

अदखलपात्र व्यक्ती
किरण काळे यांना आम्ही अदखलपात्र व्यक्ती समजतो. नगरकरही त्यांना अदखलपात्रच समजतात. ते प्रसिद्धी प्रिय व्यक्ती आहेत. त्यांना आम्ही महत्त्व देत नाही, असा टोलाही आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com