पंचनामे झाल्यानंतर लवकरात लवकर मदत जाहीर होईल - जयंत पाटील
Jayant Patil.jpg

पंचनामे झाल्यानंतर लवकरात लवकर मदत जाहीर होईल - जयंत पाटील

जळगाव जिल्ह्यातही पावसामुळे मोठे नुकसान झाले.

जळगाव : राज्यभरात विविध ठिकाणी नुकताच जोरदार पाऊस झाला. या पावसात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. काहींची जनावरे गेली. उभे पीक पावसाच्या माऱ्याने आडवे झाले.

जळगाव जिल्ह्यातही पावसामुळे मोठे नुकसान झाले. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील शहर आणि ग्रामीण भागातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

हेही वाचा...

जयंत पाटील म्हणाले, नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्यसरकारने याआधीच धोरण जाहीर केलेले आहे. त्यामुळे जळगाव जिल्हयात लवकरात लवकर पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली जाईल. 

पुरामुळे शेती खरवडून निघाली आहे, अनेक जनावरे वाहून गेली आहेत अशी माहिती माध्यमांना दिली. मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांची विल्हेवाट लावण्याचे आव्हान समोर आहे. त्याची तयारी स्थानिकांनी केली आहे. 

चाळीसगाव परिसरात नदी पात्रात सुशोभिकरणाच्या नावाखाली केलेल्या अतिरीक्त बांधकामामुळे ही पूरपरिस्थिती आल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे असून त्याला प्रचंड विरोध स्थानिकांनी केला असल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळेच पर्यावरणाच्या विरोधात विनापरवाना नदीपात्रात असलेले बांधकाम हटविण्याचे आदेश आपण जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत. 

हेही वाचा...


नदी पात्रालगत सरंक्षक भिंत बांधण्याची मागणी नागरीकांकडून समोर येत आहे. त्यामुळे गाव-वस्तीचे पुरापासून बचाव करण्यासाठी लवकरच सरंक्षण भिंत बांधण्याबाबत कार्यवाही करु. 


चाळीसगाव भागात अतिवृष्टीनंतर काही अफवा उठत आहेत. त्यावर आवाहन करताना जयंत पाटील यांनी जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. जोपर्यंत शासकीय यंत्रणा अधिकृत माहिती जाहीर करत नाही, तोपर्यंत कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये असे आवाहन यावेळी जयंत पाटील यांनी केले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in