...तर राजू शेट्टींचे आम्ही स्वागत करू : चंद्रकांत पाटील

त्यातूनच शेट्टी दुरावले होते.
If Raju Shetty is coming to us again, welcome : Chandrakant Patil
If Raju Shetty is coming to us again, welcome : Chandrakant Patil

अकोला : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख, माजी खासदार राजू शेट्टी हे आमचे जुने मित्र आहेत. मी तर त्यांना नेहमी ‘लक्ष्मीचा नवरा’ म्हणत होतो. मात्र, उठसूठ मोदींवर ते टीका करीत होते. मोदी हे आमच्यासाठी आई-वडिल आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही एक शब्द ऐकून घेणार नाही, त्यातूनच शेट्टी दुरावले होते. आता पुन्हा ते आमच्या जवळ येत असतील, तर त्यांचे स्वागतच आहे, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. (If Raju Shetty is coming to us again, welcome : Chandrakant Patil)
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठीच्या यादीतून राजू शेट्टी यांचे नाव वगळल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांच्या जागी राष्ट्रवादीने हेमंत टकले यांचे नाव दिल्याचे सांगितले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले आमदार चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेतली. त्यावेळीच शेट्टी यांचे नाव मागे घेऊन टकले यांचे नाव सूचविल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, याबाबत राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी शेट्टी यांचे नाव वगळले नसल्याचा दावा केला आहे. 

आमदारांच्या यादीतून नाव वगळल्याच्या चर्चेवर बोलताना राजू शेट्टी यांनी म्हटले आहे की माझ्या दृष्टीकोनातून विधान परिषदेची जागा महत्त्वाची नाही. जे देणं लागत होतं, ते देण्याची जबाबदारी राष्ट्रवादीची होती. द्यायचं काही नाही द्यायचं, हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. तो काय आमच्या जीवन मरणाचा प्रश्न नाही. सध्या आम्ही पूरग्रस्तांना न्याय द्यावा; म्हणून आंदोलन करतो आहोत. या आंदोलनात आम्ही व्यस्त आहोत, त्यामुळे बाकी कोणत्याही चर्चेत मला रस नाही.

या सर्व पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांना जुन्या मित्राला सोबत घेणार का, असे विचारले असता त्यांनी शेट्टी हे आमचे जुने मित्र आहेत, ते जर पुन्हा आमच्यासोबत येणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असे म्हटले आहे.

मराठा आरक्षणावर पाटील म्हणाले की, मराठा समाजाला मागास सिद्ध केल्याशिवाय आरक्षण मिळू शकणार नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना संपूर्ण यंत्रणा कामी लावून त्यांनी सात महिन्यांत हे काम केले होते. आताच्या सरकारला त्यासाठी चार वर्षे लागतील,असा टोलाही पाटील यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com