राष्ट्रवादीचे नगरसेवक खोटे बोलतात ? 'त्या चार सदस्यांचे काय करायचे'

स्थायी समितीच्या बैठकीचे सीसीटीव्ही फुटेज मागवून तपासले जाणार आहे.
Sarkarnama (63).jpg
Sarkarnama (63).jpg

पुणे : राष्ट्रवादी कॉग्रेसमधील अंतर्गतवाद चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक खोटे बोलतात का हे तपासण्यासाठी  शहराध्यक्ष प्रशांत जगताप सीसीटीव्हीची मदत घेणार आहेत. यात दोषी आढळल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे तक्रार करणार असल्याचे प्रशांत जगताप Prashant Jagtap यांनी सांगितले. जगताप पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘राष्ट्रवादी’च्या नगरसेविका आणि विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ आणि स्थायी समिती सदस्य नंदा लोणकर, बंडू गायकवाड उपस्थित होते.

प्रशांत जगताप म्हणाले, ''“स्थायी समितीच्या बैठकीत ऐनवेळी दाखल केलेल्या विषयांना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या समिती सदस्यांनी खरोखरच विरोध केला की ते सदस्य खोटे बोलतात हे स्थायी समितीच्या बैठकीचे सीसीटीव्ही फुटेज मागवून तपासले जाणार आहे. हे सदस्य खोटे बोलत असल्याचे स्पष्ट झाले तर त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत पक्षच विभागीय आयुक्त कार्यालयात तक्रार करणार आहे,” नगरसचिवांकडून स्थायी समितीच्या बैठकीचे सीसीटीव्ही फुटेज जगताप यांनी मागविले आहे

'ते' धादांत खोटं ; अजित पवार भडकले, म्हणाले...
''राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थायी समिती सदस्य अनेक वादग्रस्त विषयांवर सत्ताधारी भाजपाला वारंवार पाठिंबा देतात याची माहिती अजित पवार यांना देणार आहे. त्यानंतर ‘स्थायी’तल्या ‘राष्ट्रवादी’च्या चार सदस्यांचे काय करायचे याचा निर्णय पवारच घेतील,'' असे जगताप यांनी सांगितले. बैठकीत खरोखरच गोंधळ झाला व घोषणाबाजीत ऐनवेळी दाखल झालेले विषय सत्ताधाऱ्यांनी मान्य करून घेतले की राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपाच्या निर्णयात सहभागी होते हे तपासणार असल्याचे जगताप म्हणाले

जगताप म्हणाले, “दीपाली धुमाळ यांनी बैठकीपूर्वी समिती सदस्यांना पक्षाच्या धोरणाबाबत माहिती दिली होती.” या वक्तव्यावर लोणकर यांनी आक्षेप घेत ‘आता आम्हालाही बोलायचे आहे’ असे म्हटले. “स्थायी समितीच्या बैठकीच्या आदल्या दिवशी धुमाळ यांनी आमची बैठक घ्यायला हवी होती,” असे लोणकर यांनी सांगितले. 

अजितदादा म्हणाले, ''सर्वच बंद करण्याची वेळ आणू नका''
पुणे :  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधकांकडून मंदिरे सुरू करण्याचा भावनिक मुद्दा पुढे करण्यात येत असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार ajit pawar यांनी केली.
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com