आम्ही शेतकऱ्यांची पोरं; शेतकऱ्यांच्याच बाजूने उभारणार : डॉ. अमोल कोल्हे

प्रत्येक शेतकऱ्याचे समाधान झाल्याशिवायहा प्रकल्प आम्ही पुढे नेणार नाही.
We are the children of farmers; Will stand on the side of farmers : Dr. Amol Kolhe
We are the children of farmers; Will stand on the side of farmers : Dr. Amol Kolhe

बेल्हे (जि. पुणे) : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत काही जणांच्या मनात संभ्रम असतील, तर लवकरच (येत्या २७ किंवा २८ तारखेला) रेल्वे व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची प्रकल्पबाधित शेतकऱ्यांबरोबर बैठक घेतली जाईल. त्यांचे जे काही प्रश्न किंवा ज्या काही समस्या असतील, त्या सोडवल्याशिवाय आपण पुढे जायचे नाही, असा विश्वास शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना दिला. (We are the children of farmers; Will stand on the side of farmers : Dr. Amol Kolhe)

दरम्यान, शेतकऱ्याचं पोरगं कधी शेतकऱ्याशी बेईमानी करणार नाही, शेतकऱ्याचं पोरगं शेतकऱ्याचीच बाजू घेणार, त्या पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे आहोत' असे प्रतिपादन शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (ता. ७ ऑगस्ट) बेल्हे (ता. जुन्नर) येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.

बेल्हे येथे श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जुन्नरचे आमदार अतुल बेनके होते. या कार्यक्रमास शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, तुळशीराम महाराज सरकटे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, शरद लेंडे, अंकुश आमले, महादेव वाघ, अनघा घोडके, बाळासाहेब खिलारी, सरपंच गोरक्षनाथ वाघ, संस्थेचे अध्यक्ष वसंत जगताप, उपाध्यक्ष सदाशिव बोरचटे आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी बोलताना खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, संसदेच्या या अधिवेशन काळात महाराष्ट्रासाठी राष्ट्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या तर्फे एकूण २६ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्या निधीपैकी जवळपास तीस टक्के म्हणजे ८ हजार २०० कोटी रुपयांचा निधी एकट्या शिरूर लोकसभा मतदार संघासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यातही पुणे-नगर रस्त्यासाठी भरीव निधी असणार आहे.

जुन्नरचे आमदार अतुल बेनके म्हणाले की, प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक शेतकऱ्याचे समाधान झाल्याशिवाय पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा प्रकल्प आम्ही पुढे नेणार नाही. 

दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत जगताप यांनी, तर मनोज बेल्हेकर यांनी सूत्रसंचालन केले. सावकार पिंगट यांनी आभार मानले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com