जयंतरावांच्या राष्ट्रवादी विस्ताराला ठाकरे-कदमांच्या घरोब्याचे आव्हान

या घडीला येथे विश्‍वजीत प्रबळ, प्रमुख नेते आहेत.
Dr. Vishwajeet Kadam included in Chief Minister Thackeray's Good Book :
Dr. Vishwajeet Kadam included in Chief Minister Thackeray's Good Book :

पलूस (जि. सांगली) : महापुरातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम यांच्या पाठीवर हात ठेवत कौतुक केले. त्याला विविध राजकीय अंगाने पाहिले पाहिजे. एकीकडे राष्‍ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री जयंत पाटील पलूस तालुक्यात पक्षाची मजबूत बांधणी करत असताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस नेत्याला दिलेले बळ महत्वाचे मानले जाते. (Dr. Vishwajeet Kadam included in Chief Minister Thackeray's 'Good Book')

भविष्यात राज्याचा राजकीय पट मांडताना काँग्रेसचा प्रमुख चेहरा म्हणून विश्‍वजीत यांचे स्थान महत्वाचे असेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संकटात संधी साधत काँग्रेसच्या नव्या नेतृत्वाला गोंजारले आहे. त्याचा फायदा पलूस तालुक्याला अधिक निधीच्या रुपाने होतोय का, याकडे पलूसकरांचे लक्ष असणार असेल.

मुख्यमंत्र्यांच्या ‘गुड बुक’मध्ये असल्याचे अनेक राजकीय फायदे असतात. राज्यात सध्या तीन पक्षांचे महाआघाडी सरकार आहे. त्यात निधीची प्रचंड स्पर्धा आहे. कोरोना संकट, नैसर्गिक संकट, विरोधकांचे हल्ले, अंतर्गत नाराजीनाट्य यामुळे बरेच वादंग उठत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांची स्वबळाची भाषा, त्याला पक्षाचे नेते राहुल गांधी यांचा हिरवा कंदील, त्यामुळे शिवसेना-काँग्रेसमधील धुसफूस या बातम्यांनी वातावरण गरम आहे. अशावेळी विश्‍वजीत कदम यांचा समावेश उद्धव ठाकरे यांच्या ‘गुड बूक’मध्ये असल्याचेच संकेत महापुराच्या निमित्ताने मिळाले.

विश्वजीत यांचे वडिल डॉ. पतंगराव कदम यांचाही मुख्यमंत्र्यांवर प्रभाव असायचा. अगदी विलासराव देशमुख, अशोक चव्हाण यांना ते हक्काने एकेरी संबोधायचे. त्यामुळे त्यांना कामाचा धडाका लावता आला, कुठल्या फायली कधी अडल्या नाहीत. आता विश्‍वजीत यांना मुख्यमंत्र्यांच्या अधिक जवळ जाण्याची संधी आहे. ती ते कशी साधतात, हेही पहावे लागेल.

विश्‍वजीत यांचे राजकारण आदित्य ठाकरे यांना समांतर जाणारे आहे. अशावेळी उद्धव ठाकरे यांनी विश्‍वजीत यांचा उल्लेख ‘अरे, तुरे’, असा करत आणि त्याबद्दल जाहीरपणे ‘ही आपुलकीची, हक्काची भाषा’, असल्याचे सांगत विश्‍वजीत समर्थकांमध्ये चैतन्य पसरवले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्षाचा विस्तार, पश्‍चिम महाराष्ट्रात व विशेषतः सांगली जिल्ह्यात पक्षाची स्थिती याची पुरती जाणीव आहे. पक्षाच्या विस्ताराला येथे मर्यादा आहेत. मात्र, प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जुळवून घेतल्यास शिवसैनिकांना लोकांशी जोडून पुढे जाणे सोपे होणार आहे. 

पलूस तालुक्यात राष्ट्रवादीचा विस्तार करण्याचा जयंत पाटील यांचा झपाटा सुरु आहे. या घडीला येथे विश्‍वजीत प्रबळ, प्रमुख नेते आहेत. त्यांच्या ‘गुड बूक’मध्ये शिवसैनिकांना स्थान मिळाले तर तळागाळातल्या कार्यकर्त्यालाही संधी मिळू शकते. त्यामुळे ठाकरे यांनी विश्‍वजीत यांच्या पाठीवर ठेवलेला हात हा येथील शिवसैनिकांना विश्‍वजीत यांच्या अधिक जवळ नेणारा ठरू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्तारवादी धोरणात काँग्रेस-शिवसेनेचा घरोबा रंगतदार असू शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com