विजयदादांनी सूत्रे हाती घेतली आणि अकलूज नगरपरिषदेचा निर्णय झाला 

त्यांची काम करण्याची शैली, मृदू स्वभाव उपयोगात आला.
Vijay Singh Mohite Patil took the lead and Akluj Municipal Council decided
Vijay Singh Mohite Patil took the lead and Akluj Municipal Council decided

नातेपुते (जि. सोलापूर) : माळशिरस तालुक्यातील अकलूज, माळेवाडी ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेत, तर नातेपुते ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्याचा अंतिम आध्यादेश मंगळवारी (ता. 3 ऑगस्ट) राज्य सरकारकडून प्रसिद्ध झाला. या कामासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची काम करण्याची शैली पुन्हा एकदा कामी आली आहे. उपोषण, आंदोलनानंतरही निर्णय होत नसल्याने अखेर विजयदादांनी सूत्रे हाती घेतली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पवारांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापर्यंत सर्वांच्या गाठीभेटी घेत हा प्रश्न धसास लावला. त्यामुळे त्यांची काम करण्याची शैली, मृदू स्वभाव उपयोगात आला. (Vijay Singh Mohite Patil took the lead and Akluj Municipal Council decided)
 
अकलूज, माळेवाडीचे रुपांतर नगरपरिषदेत, तर नातेपुते ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्याचा पहिला अध्यादेश देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री असताना 11 सप्टेंबर 2019 रोजी राज्यपालांच्या सहीने निघाला होता. परंतु त्यानंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाले. मोहिते पाटील कुटुंबीय विशेषतः विजयसिंह मोहिते पाटील आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माढा लोकसभा मतदारसंघात आणि माळशिरस विधानसभा मतदारसंघात भाजपचा विजय होण्यात मोहिते पाटलांचा सिंहाचा वाटा आहे. त्यानंतर माळशिरस तालुक्यातील कामांच्या संदर्भात मोहिते-पाटलांची कोंडी करण्याचा प्रयत्न होताना दिसून आला. 

अकलूज, नातेपुतेच्या पाठीमागून अनेक ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिकेमध्ये झाले आहे. या दरम्यान अकलूज, नातेपुते ची ग्रामपंचायत म्हणूनच निवडणूक सुद्धा झाली. उपोषणे, आंदोलने झाली.  प्रांत कार्यालयासमोर 43 दिवस चक्री उपोषण झाले. दोन्ही ग्रामपंचायतींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाकडून आदेश होण्यापेक्षा सर्व कामे सर्वसंमतीने होण्याचा प्रयत्न विजयसिंह मोहिते पाटील यांचा असतो, तो त्याचा स्वभाव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ता.12  जुलै रोजी नातेपुते आणि अकलूज येथील काही मान्यवरांसह एक शिष्टमंडळ सर्वप्रथम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीस गेले. त्यांच्याशी संवाद साधून सर्व प्रश्न त्यांच्या कानावर घातले आणि नगरपरिषद, नगरपंचायत करण्यासाठी विनंती केली. त्यांच्या सूचनेनुसार हे शिष्टमंडळ नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले आणि लवकरच सरकारकडून नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे आदेश काढण्याचा शब्द घेतला. तसेच, राज्यपालांची देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतीने भेट घेऊन वस्तुस्थिती सांगितली.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे 1970 पासून जिल्ह्यातील राजकारणात आणि 1980 पासून राज्य मंञिमंडळात विविध पदांवर कार्यरत होते.  आजही  सर्व पक्ष्यांमध्ये त्यांचा आदर केला जातो, हे पुन्हा एकदा शिष्टमंडळातील सदस्यांना मंत्रालयात दिसून आले आणि खऱ्या अर्थाने माळशिरस तालुक्यातील राजकीय कारणांमुळे थांबलेला नगरपंचायतीचा प्रश्न राजकारणापेक्षा सहमतीने फक्त विजयदादांकडून ‘डिनर डिप्लोपसी’ व्दारे हा प्रश्न मार्गी लागला आहे.

कारखाना सुरू होण्याच्या आशा वाढल्या 

सदाशिवनगर येथील श्री. शंकर सहकारी साखर कारखाना यावर्षी चालू  व्हावा, अशी ऊस उत्पादकांची मागणी आहे. त्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे आपल्या परिने प्रयत्न करीत आहेत. देणी खूप आहेत. बँकांकडून त्या प्रमाणात कर्ज मिळायला अडचणी येत आहेत. नुकतेच केंद्रात सहकार खाते निर्माण झाले आहे. पहिले सहकार मंत्री अमित शहा आहेत. आमदार रणजितसिंह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या स्नेहपूर्ण संबंधामुळे निधी उपलब्ध होईल, अशी आशा आहे. कोणत्याही मार्गाने निधी उपलब्ध करून कारखाना स्वतः सुरू करावाकिंवा वेळप्रसंगी श्री राम साखर कारखाना फलटण यांच्याप्रमाणे भाडेतत्त्वावर कारखाना चालवण्यास देऊन ऊस उत्पादकांचा प्रश्न मार्गी लावावा. कामगारांचे थकीत पगार द्यावेत. ऊस उत्पादकांचे मागील देणी द्यावीत, अशी तालुक्यातून मागणी होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com