एकनाथ खडसेंवर मी टीका करणार नाही; पण.... : आशिष शेलार

आगामी निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल.
I will not criticize Eknath Khadse: Ashish Shelar
I will not criticize Eknath Khadse: Ashish Shelar

जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर आपण कोणतीही टीका करणार नाही. मात्र, ज्यांनी पक्ष सोडला, त्यांची दुर्गती झाली. भाजपचे नेते गिरीश महाजन यांना बाजूला करण्याचा कोणताही प्रश्न नाही, असे मत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मुंबईचे आमदार आशीष शेलार यांनी व्यक्त केले. (I will not criticize Eknath Khadse: Ashish Shelar)

जळगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार शेलार बोलत होते. एकनाथ खडसे यांनी भाजप सोडल्यामुळे पक्षाचे नुकसान झाले आहे, या प्रश्नावर उत्तर देताना आमदार शेलार म्हणाले की, एकनाथ खडसे यांच्यावर मी कोणतीही टीका करणार नाही. मात्र, ज्यांनी पक्ष सोडला त्यांची दुर्गती झाली आहे. आगामी निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल.

गिरीश महाजन आमचे नेते 

माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना स्थानिक नेतृत्वातून हटविण्याचा प्रयत्न होत आहे का? याला उत्तर देताना आमदार आशीष शेलार म्हणाले की, गिरीश महाजन आमचे नेते आहेत. त्यांना बाजूला करण्याचा कोणताही प्रश्न येत नाही. पक्षाच्या राज्यातील प्रश्नासाठी ते राज्यभर फिरत असतात, त्यामुळे स्थानिक कार्यक्रमांना ते उपस्थित राहू शकत नाहीत.

मनसेसोबत युती नाहीच

आगामी निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करण्याबाबत आशिष शेलार यांनी सांगितले की, राज ठाकरे यांच्या पक्षासोबत भाजपची युती बिलकुल होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेससोबतही युती होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

....तर अदानींवर सरकार कारवाई का करत नाही

छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव मुंबई विमानतळाला देण्याचा निर्णय भाजप सरकारच्या काळात झाला. त्यांचे नाव बदलण्यास भाजपचा विरोध असणार आहे. मात्र, हे विमानतळ अदानी यांना देखरेखीसाठी देताना नाव टाकण्याबाबत राज्यातील ठाकरे सरकारने अट का घातली नाही? अदानी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला असेल तर त्यांच्यावर कारवाई का केली नाही, असा सवाल भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. 

आमदार आशिष शेलार तीन दिवस खानदेश दौऱ्यावर आहेत. आज ते जळगाव जिल्ह्यात होते. त्यांनी भाजप कार्यालयात बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना आमदार आशिष शेलार म्हणाले की, मुंबई, नवी मुंबई विमानतळ देखभाल करण्यासाठी हस्तांतरित करताना राज्य सरकारने नाव टाकण्याबाबत अटी शर्ती टाकून तसा ठराव मंजूर करून घ्यावयास हवा होता. मात्र तसा कोणताही ठराव या सरकारने केला नाही. जर अदानी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला असे जर सरकार म्हणत असेल तर या सरकारने त्यांच्यावर कारवाई  का केली नाही? रात्री हात मिळवणी करायची आणि दिवसा आंदोलन करून टक्केवारीसाठी दबाव आणायचा असे हे सरकार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com