आमदार राऊत गटाचे माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले राष्ट्रवादीच्या वाटेवर 

बार्शी शहरात बारबोले गट आपली ताकद राखून आहे.
Barshi's Former nagaradhyakshaVishwas Barbole on the way to the NCP
Barshi's Former nagaradhyakshaVishwas Barbole on the way to the NCP

बार्शी (जि. सोलापूर) : बार्शी नगरपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात शहरात सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत. त्याच अनुषंगाने माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा बार्शी शहर अन् तालुक्यात रंगली आहे. बारबोले हे सध्या आमदार राजेंद्र राऊत यांच्या गोटात असून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास राऊत यांची राजकीय ताकद कमी करणारे ठरणार आहे. कारण बार्शी शहरात बारबोले गट आपली ताकद राखून आहे. (Barshi's Former nagaradhyakshaVishwas Barbole on the way to the NCP) 

दरम्यान, आमदार राजेंद्र राऊत यांचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी माजी मंत्री दिलीप सोपल, राजेंद्र मिरगणे, भाऊसाहेब आंधळकर एकत्र येऊन लढा देणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे बारबोले हे राष्ट्रवादीत प्रवेश करून स्वतंत्रपणे लढणार की या तिघांना साथ देणार की राऊत यांच्यासोबत कायम राहणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

हेही वाचा :  मोहिते पाटलांच्या लढाईला यश; अकलूज नगरपरिषदेची अधिसूचना निघाली
 
बार्शी नगरपरिषदेची निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यातच माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तालुक्याची नेतृत्व करण्याची हुकलेली संधी राष्ट्रवादीच्या माध्यमातून पुन्हा मिळवायचीय, असे बारबोले यांच्या निकटवर्तीयांमधून बोलले जात आहे.

नगरपरिषदेच्या 1996 च्या निवडणुकीत बारबोले यांनी सोपल यांच्याशी सवतासुभा करुन स्वतंत्रपणे लढून यश संपादन केले होते. त्यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी आमदार राऊत यांना विधानसभेसाठी शिवसेनेने संधी दिली होती. पण, त्यांचा निसटता पराभव झाला होता अन् राऊतांचे नेतृत्व उदयास आले होते.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात बारबोले यांची सोपल, राऊत यांच्याकडे राहून पिछेहाट होत असल्याने त्यांची नवी पिढी स्वाभिमानी भूमिका घेत राष्ट्रवादी पक्षाचे नेतृत्व स्वीकारावे, या निर्णयाप्रत आली असल्याची चर्चा आहे. विश्वास बारबोले यांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी गाठीभेटी झाल्या आहेत. बार्शी तालुक्यासाठी राष्ट्रवादीला नेतृत्वाची गरज असल्याने बारबोले यांना राष्ट्रवादीकडून गळ घातली जात असल्याची चर्चा शहरासह तालुक्यात आहे. बारबोले हे लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

आमचे अजितदादांशी पूर्वीपासून संबंध

प्रत्येक निवडणुका जवळ आल्या की, आमच्यासंदर्भात काहींना काही चर्चा सुरू होत असते. वरिष्ठ नेतेमंडळी काहीही म्हणू शकतात. मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळीही अशीच अफवा उठवली होती. आम्ही टीमवर्क करतो. लोक चर्चा करतात. आम्ही कोणाला काहीही बोलत नाही. आमचे अन् अजितदादांचे पूर्वीपासून संबंध आहेत. महिना, पंधरा दिवसाला मी कामासाठी अजितदादांकडे भेटायला जात असतो, असे बार्शीचे माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com