संसदेच्या आवारातच हरसिमरतकौर बादल अन् काँग्रेसचे खासदार भिडले...  

हरसिमरतकौर यांची निदर्शने म्हणजे ढोंग असल्याचे बिट्टू यांनी म्हटले.
Harsimrat Kaur Badal and Ravneet Bittu accuse each other .jpg
Harsimrat Kaur Badal and Ravneet Bittu accuse each other .jpg

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांवरून राजकारण तापलेले आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही उमटत आहेत. बुधवारी शिरोमणी अकाली दलच्या खासदार माजी मंत्री हरसिमरत कौर बादल (Harsimrat Kaur Badal) आणि काँग्रेस खासदार रवनीत बिट्टू (MP Ravneet Bittu) यांच्यात संसद भवन परिसरात कृषी कायद्यांवरून चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. (Harsimrat Kaur Badal and Ravneet Bittu accuse each other) 

या नेत्यांच्या खडाजंगीचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये हरसिमरतकौर बादल आणि रवनीत बिट्टू कृषी कायद्यांवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. हरसिमरतकौर या संसद भवन परिसरात कृषी कायद्यांविरोधात हातात फलक घेऊन घोषणाबाजी करत होत्या. यावेळी काँग्रेस खासदार रवनीत बिट्टू त्याठिकाणी पोहोचले आणि त्यांनी ही निदर्शने बोगस असल्याचे म्हटले.

हरसिमरतकौर यांची निदर्शने म्हणजे ढोंग असल्याचे बिट्टू यांनी म्हटले. हरसिमरतकौर स्वतः मंत्री असताना या कायद्यांना विरोध केला नाही. त्यांनी स्वतः या विधेके पारित केली. शेतकऱ्यांमध्ये कायद्यांविरोधात रोष वाढत गेला तेव्हा हरसिमरत यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. जेव्हा विधेक पारित होत होते तेव्हा तुम्ही विरोध का नाही केला? आता केवळ दिखाव्यासाठी तुम्ही कृषी कायद्यांचा विरोध करत आहात,'' असे काँग्रेस खासदार बिट्टू यांनी म्हटले. 

रवनीत बिट्टू यांच्या आरोपांना हरसिमरत कौर बादल यांनीही आक्रमक प्रत्युत्तर दिले. विधेयक पारित होत असताना काँग्रेस खासदार राहुल गांधी कुठे होते असे यांना विचारा. ते संसद सोडून गेले होते आणि काँग्रेसने वॉकआऊट केल्यामुळेच ही विधेयके पारित होण्याला मदत मिळाली. असे हरसिमरत कौर यांनी म्हटले.   

Edited By - Amol Jaybhaye


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com