स्वतःच्या ताकदीवर मी मोहोळचा आमदार निवडून आणू शकतो

राष्ट्रवादीत मीपणा चालत नाही, तो सोडला पाहिजे.
I can elect Mohol MLA on my own strength : Rajan Patil
I can elect Mohol MLA on my own strength : Rajan Patil

मोहोळ (जि. सोलापूर) : मोहोळ तालुक्यातील एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला आता गटबाजीचे ग्रहण लागले असून, एकमेकांविरोधात टीका टिप्पणीच्या फैरी झडत आहेत. माजी आमदार राजन पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील हे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत, त्यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. (I can elect Mohol MLA on my own strength : Rajan Patil)

गेल्या शनिवारी मोहोळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात राष्ट्रवादीचा स्नेह मेळावा पार पडला. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर, माजी उपसभापती मानाजी माने यांची अनुपस्थिती होती. याबाबत माजी आमदार राजन पाटील यांनी सांगितले की, आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही, पक्षाचे काम करताना आमच्याकडे येऊन जे मोठे झाले, ते आता आमच्या विरोधात गेले. भविष्यात मी स्वतःच्या ताकदीवर मोहोळ तालुक्याचा आमदार निवडून आणू शकतो, असा आत्मविश्वास पाटील यांनी व्यक्त केला. त्यामुळे राष्ट्रवादीत गटबाजी आहे, उघड आहे. 

दरम्यान एक ऑगस्ट रोजी अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनी बारसकर यांनी सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन केले होते, त्याचे अध्यक्षस्थान प्रवक्ते उमेश पाटील यांनी भूषविले होते. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला असता राष्ट्रवादीत मीपणा चालत नाही, तो सोडला पाहिजे. येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुका समविचारींना बरोबर घेऊन लढणार असल्याचे सूतोवाच प्रवक्ते उमेश पाटील यांनी यापूर्वीच केले आहे, त्यामुळे मोहोळ तालुक्यातील आगामी निवडणुका या रंगतदार होण्याची शक्यता आहे. त्यावरून राष्ट्रवादी पक्षात अंतर्गत संघर्ष जोरदारपणे सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. 

गेल्या किमान दहा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाअध्यक्षपदी राजन पाटील यांचे खंदे समर्थक व विश्वासू सहकारी प्रकाश चवरे हे आहेत. पक्षाचे आम्ही पदाधिकारी असतानादेखील आम्हाला पक्षाच्या बैठकीचे निरोपही दिले जात नाहीत, त्यामुळे गटबाजी तालुका अध्यक्षच करतात, त्यामुळे त्यांच्या हकालपट्टीची मागणी पक्षाच्या वरिष्ठांकडे करणार असून, लोकांमुळे तुम्ही आहात, हा सल्ला राजन पाटील यांना देण्यास उमेश पाटील विसरले नाहीत. 

आगामी निवडणुका या समविचारींना एकत्र घेऊन लढणार असल्याचे सूतोवाच पाटील यांनी करताच राजन पाटील यांच्यावरील नाराज गट आपसूकच उमेश पाटील यांच्याकडे आकर्षला जाऊ लागला आहे. उमेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसापासून प्रत्येक तालुक्यात जनता दरबाराचा नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात नागरिकांना आपली गाऱ्हाणी व गावच्या विकासाच्या अडचणी मांडण्याची संधी पाटील यांनी उपलब्ध करून दिली आहे. गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ग्रामपंचायतींच्या चाव्या युवकांच्या हाती नागरिकांनी सोपविल्या आहेत, त्यामुळे युवकही मोठ्या प्रमाणात उमेश पाटील यांच्याकडे आकर्षला जाऊ लागला आहे. 

मोहोळ तालुक्यासाठी कोट्यवधीचा निधी आणला म्हणून डांगोरा पिटणारे व फोटोसेशन करणारे आमदार यशवंत माने यांनी मोहोळच्या विकासासाठी किती निधी दिला, याचे आत्मपरीक्षण करावे. जो निधी मिळाला आहे, तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मिळाला आहे. त्यामुळे आमदार माने यांनी स्वतः याचे आत्मपरीक्षण करावे, असे आव्हानही बारसकर यांनी आमदारांना दिले.  

मोहोळ तालुक्यात जिल्ह्यासह राज्य व देश पातळीवर खेळणारे खेळाडू आहेत. तालुक्याला क्रीडा संकुल मंजूर झाले आहे त्यासाठीची जागेची अडचण सांगितल्यामुळे ते प्रलंबित आहे. प्रथम नगराध्यक्ष बारसकर यांनी स्वतःची पाच एकर जागा देण्याचे कबूल केले. मात्र, याचे श्रेय बारसकर यांना जाऊ नये; म्हणून ते प्रलंबीत ठेवल्याचा आरोपही माने यांनी केला. एकंदरीत पाहता तालुक्यात एकसंघ असणाऱ्या राष्ट्रवादीला गटबाजीचे ग्रहण लागल्याचे यावरून स्पष्ट होते, यात शंका नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com