उजनी धरण पालटोट क्षेत्रातील अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटी उद्ध्वस्त

या कारवाईमध्ये एकूण ४० लाख रुपये किमतीच्या वाळूउपसा करणाऱ्या यांत्रिकी बोटी उद्ध्वस्त करण्यात आल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणलेआहे.
VAlu taskari.jpg
VAlu taskari.jpg

इंदापूर : तहसिलदार अनिल ठोंबरे व इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या संयुक्त पथकाने तालुक्यातील उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील गलांडवाडी नंबर एक ते गंगावळण परिसरात अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटी जिलेटिन च्या साह्याने उद्ध्वस्त करण्यात आल्या. (Ujani dam destroys illegal sand dredging boats in Paltot area)

या कारवाईमध्ये एकूण ४० लाख रुपये किमतीच्या वाळूउपसा करणाऱ्या यांत्रिकी बोटी उद्ध्वस्त करण्यात आल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणलेआहे. पोलिसांनी या प्रकरणी वाळू माफियांवरगंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत मात्र जिलेटीनने उडवून दिलेल्या बोटींचेमालककोण हे गुलदस्त्यातच ठेवल्याने ही नूरा कारवाई असल्याची चर्चा आहे. 

हेही वाचा..

आज (ता. 31) तहसीलदार अनिल ठोंबरे, इंदापूर पोलीसठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेशमाने, पोलीस शिपाई अमोल गारुडी, समाधान केसकर, राजू नवले, अर्जुन भालसिंग, पोलीस पाटील राजेंद्र शिंदे, अरुण कांबळे, संजय राऊत, महसूल विभागाचे तलाठी यांनी कारवाईमध्ये भाग घेतला. 

अवैध वाळू व्यवसायात बक्कळ कमाई होत असल्याने दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पुन्हा बोटीने वाळू उपसा सुरू होतो. अवैध वाळू वाहतुकीमुळे परिसरातील रस्ते देखील खराब होतात. भीमा नदीमधील विविध जैव विविधता नष्ट होत असून, पाणी दुषित होत असल्याने त्यामुळे मुतखडे, विविध प्रकारचे कर्करोग याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने अवैध वाळू उपश्या बरोबरच नदीत येणारे मैला मिश्रित, औद्योगिक सांडपाणी यावर कायमस्वरूपी बंदी घालावी अशी मागणी उजनी पाणलोट क्षेत्रातील नागरिक करत आहेत.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com