मंगलदास बांदल यांच्या दुसऱ्या पहिलवान मित्रालाही अटक

प्रदीप कंद यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपीचा या गुन्हात सहभाग आहे.
Sarkarnama Banner - 2021-07-31T150129.650.jpg
Sarkarnama Banner - 2021-07-31T150129.650.jpg

शिक्रापूर : पुणे जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल Mangaldas Bandal यांच्यावर लोणीकंद पोलिस ठाण्यामध्ये आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी बांदल यांच्यावर शिक्रापूर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. एका शेतकऱ्याला रिव्हॉल्वर दाखवून गहाण खतावर सह्या करणे, गहाणखतावर शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेत ६ कोटी ७५ लाखांचे कर्ज आणि बोजा कमी करण्यासाठी पुन्हा त्याच शेतक-याकडे एक कोटींची मागणी केल्याचा हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगलदास बांदल यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे नेते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपीचा या गुन्हात सहभाग आहे.

संदीप भोंडवे Sandeep Bhondwe, सचिन पलांडे, विकास भोंडवे व शिवाजीराव भोसले बँकेतील एक अधिकारी असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी  गंगाराम सावळा मासाळकर (वय ७४, रा.वढु खुर्द, ता.हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. संदीप भोंडवे, विकास भोंडवे यांना अटक केली आहे.

युवक कॉग्रेस पदाधिकाऱ्यावर खंडणी, अपहरणाचा गुन्हा
मासाळकर यांच्या गट नं.१५३/१ मधील ३ हेक्टर ७१ आर (जवळपास साडे नऊ एकर) जमिन शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेत एका कर्जप्रकरणासाठी गहाण ठेवून त्यावर कर्ज काढावे, म्हणून बांदल तसेच संदीप भोंडवे, सचिन पलांडे यांनी सन २०१३ मध्ये चारचाकी गाडीतून मासाळकर यांना वढु खुर्द (ता. हवेली) येथील जिल्हा परिषदेच्या एका शाळेजवळ नेऊन जबरदस्तीने गहाणखत करुन घेतले होते. 

डॉ. अभिनव देशमुखांचा शिरुर पोलिसांना दणका
यावेळी शिवाजीनगर भोसले सहकारी बॅंकेतील एक अधिकारीही सोबत होता. पुढील काळात हाच बोजा काढण्यासाठी बांदल, संदीप भोंडवे, विकास भोंडवे व सचिन पलांडे यांनी एक कोटीची मागणी केली. मासाळकर यांच्या फिर्यादीवरुन बांदल, संदीप भोंडवे, विकास भोंडवे व सचिन पलांडे व या गुन्ह्यात सहभागी शिवाजीराव भोसले बॅंकेचा एक अधिकारी (नाव उपलब्ध नाही) यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.  
   
या गुन्ह्यातील आरोपींपैकी संदीप भोंडवे व सचिन पलांडे हे सन २००४ मध्ये तत्कालीन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, भाजपाचे नेते प्रदीप कंद यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपी आहेत.  हा खटला तडजोडीत मिटला आहे.  कंद आणि भोंडवे यांनी पुढील काळात एकच राजकीय व्यासपीठावर आले. त्यांनी विविध निवडणूकांमध्ये एकमेकांना राजकीय हिताची भूमिका घेतल्या.  भोंडवे हे सन २०१४ च्या विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारीच्या तयारीत होते तर कंदही सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून   इच्छुक होते. या आरोपींनी २००४ मध्ये तत्कालीन भाजपाच्या एका महिला पदाधिकाऱ्याची अडीच कोटींची फसवणूक केली होती. 
 Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com