जे बोचके बाहेर गेले, त्याला परत शिवसेनेत घ्यायचे नाही : राऊतांचा बुचकेंना नाव न घेता टोला

जो शिवसेनेतून गेला, तो दुसऱ्या घरात सुखी होत नसतो.
Sanjay Raut criticizes Asha Buchke without naming her
Sanjay Raut criticizes Asha Buchke without naming her

पुणे : जुन्नरच्या शिवसैनिकांचे महाराष्ट्रात वेगळे मार्केट आहे, ते कमी होत नसून राज्यात ५५ ठिकाणी भगवा फडकला. जुन्नरमध्येही भगवा फडकायला हवा होता, तो फडकला नसल्याची खंत आहे. तसेच, शिवसेना हे एक मंदिर आहे. डोक्यात राग घालून जायचे आणि परत यायचे, असे करू नका आपले एकच कुटुंब आहे. जो शिवसेनेतून गेला, तो दुसऱ्या घरात सुखी होत नसतो. जे बोचके बाहेर गेले, ते परत आले तरी त्यांना परत घ्यायचे नाही, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता शिवसेनेतून भाजपत गेलेल्या जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांना टोला लगावला. (Sanjay Raut criticizes Asha Buchke without naming her)

जुन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने आळेफाटा या ठिकाणी आज (ता. ४ सप्टेंबर) मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी बुचके यांच्या पक्षांतरावर अप्रत्यक्ष भाष्य केले.

माजी आमदार रवींद्र मिर्लेकर म्हणाले की भविष्यात जुन्नरचा आमदार हा शिवसेनेचाच असेल. त्यासाठी शिवसैनिकांनी आतापासूनच कामाला लागावे. शिवसेनेने अनेकांना मोठे केले आहे. मात्र, त्यांना त्याची जाणीव नसून अशा लोकांनी परत स्वगृही येऊन शिवसेनेत सामील झाले पाहिजे.
 
हेही वाचा : माझे हात दगडाखाली अडकलेले नाहीत, त्यामुळे मी कुणालाही घाबरत नाही

माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले की, राज्यात जरी महाआघाडी असली तरी येणाऱ्या सर्व निवडणुका शिवसेना पक्ष स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे सर्वांनी तयारी लागावे. गेल्या दोन वर्षांत दहा ते बारा कोटी रूपयांचा निधी जुन्नर मतदार संघात विविध कामांसाठी दिलेला आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी आपण प्रयत्न करत असून वेळोवेळी कायदा आणि न्याय विभागाकडे पाठपुरावा करून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, यासाठी प्रयत्न करत आहे.

माजी आमदार सोनवणे म्हणाले की, कोरोनाच्या काळात उत्तम कामगिरी करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातील सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या पाचमध्ये आहेत. त्याचा आम्हा शिवसैनिकांना अभिमान आहे. जुन्नर हा पर्यटन तालुका म्हणून जाहीर झाला असून या ठिकाणी बिबट सफारी केंद्र तसेच दाऱ्या घाटाचे काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे उत्तम काम असूनही एका अभिनेत्यासमोर एक उत्तम नेत्याला पराभावाला जावे लागले. आपल्यातील भांडणाने समोरच्याचा फायदा होतो. जी माणसे समाजात वावरत नाहीत, ज्यांचे मोबाईल चोवीस तास बंद असतात, ते पुण्या-मुंबईला जाऊन रहातात आणि फिरायला जुन्नर तालुक्यात येतात, अशा लोकप्रतिनिधींना घरचा रस्ता दाखवा, असे आवाहन माजी आमदार सोनवणे यांनी शिवसैनिकांना केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com