दोन वेळा निवडून येऊनही मला आज संषर्घ करावा लागतोय 

त्यावेळी लोक म्हणाले की मोदींमुळे अपघाताने निवडून आले.
Even after being elected twice, I have to struggle today : Manda Mhatre
Even after being elected twice, I have to struggle today : Manda Mhatre

नवी मुंबई  ः सार्वजनिक जीवनात काम करत असताना महिलांना किती संषर्घाला तोंड द्यावे लागते, त्याचा गेली तीस वर्षे मी अनुभव घेत आहे. मी दोन वेळा निवडून आले आहे, तरीही आजही मला संषर्घ करावा लागत आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी पक्षात होत असलेल्या घुसमटीवर अप्रत्यक्ष भाष्य केले. (Even after being elected twice, I have to struggle today ः Manda Mhatre)

विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान नवी मुंबईत करण्यात आला. त्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाच्या आमदार म्हात्रे बोलत होत्या.

म्हात्रे यांनी सांगितले की, आज ३० वर्षांच्या राजकारणात मी वेगवेगळे अनुभव घेतले आहेत. संषर्घ करत असताना एखादी महिला चांगलं काम करत असेल आणि तिला पुरस्कार मिळाला तर तिच्या मागं कशी कैची लावायची, हे या शाळेत (राजकीय क्षेत्रात) शिकायचे. पहिल्यांदा मी दीड हजार मताने निवडून आले. त्यावेळी लोक म्हणाले की मोदींमुळे अपघाताने निवडून आले. त्यावेळी तेरा दिवसांच्या अगोदर मला तिकिट मिळाले होते. तुम्ही सर्व कर्तृत्ववान महिला असल्यामुळे मी तुम्हाला हे सर्व सांगत आहे. तुम्हाला कळलं पाहिजे की कसा कसा संषर्घ महिलांना करावा लागतो. या वेळी ८९ हजार मतांनी निवडून आले. आता मोदींची लाट नव्हती. माझं काम आणि कर्तृत्व होते. पण मीडियाला हाताशी धरून महिलांनी केलेले काम झाकाळून टाकायचे. त्यांच्या बातम्या येऊ द्यायच्या नाहीत. (महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांना उद्देशून) तुम्हाला खूप अनुभव असेल. माझ्यापेक्षा जास्त असणार. कारण तुमचा ग्रामीण भाग आहे ना. शहरात एवढं होत असेल तर ग्रामीण भागात किती असेल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

जी महिला नऊ महिने मूल पोटात ठेवून कळा सहन करते आणि त्याला जन्म देतो, तिची शक्ती किती आहे, हे तिने स्वतः ओळखले पाहिजे. जेव्हा ती आपल्यातील शक्ती ओळखेल ना, त्यावेळी असल्या लोकांना धडा शिकवायला वेळ लागत नाही. आजही मला संषर्घ करावा लागत आहे. दोन वेळा निवडून आले, म्हणजे तुम्हालासुद्धा किती त्रास होत असेल. पण, ह्या त्रासाला अजिबाज घाबरू नका. स्वतःची शक्ती आणि नाव निर्माण करा आणि कुबड्या घेऊन कधीही काम करू नका, असा सल्लाही आमदार मंदा म्हात्रे यांनी उपस्थित महिलांना दिला.

नवी मुंबईची जनता, इथले नागरिक जे माझ्यावर प्रेम करतात. पण कधी कधी काय होतं की आपल्याच घरातील माणसं म्हणजे आपल्याच पक्षातील माणसं एखादी स्त्री चांगलं काम करायला लागली की त्यांना भीती निर्माण होते. अशी भीती निर्माण झाली की मग फोटो टाकायचे नाहीत, कार्यक्रमाला बोलवायचे नाही, असे प्रकार घडतात. जेव्हा अशी भीती निर्माण होते, तेव्हा समजायचे की आपलं कार्य चांगलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com