माझे हात दगडाखाली अडकलेले नाहीत, त्यामुळे मी कुणालाही घाबरत नाही

मी स्पष्ट बोलते. मला तिकिट देऊ अथवा न देऊ.
माझे हात दगडाखाली अडकलेले नाहीत, त्यामुळे मी कुणालाही घाबरत नाही
I'm not afraid of anyone: Manda Mhatre

नवी मुंबई  ः मी कुणालाही घाबरत नाही. ज्यावेळी माझे हात दगडाखाली अडकले नाहीत ना, त्यावेळी मला कुणालाही घाबरायची गरज नाही. मी स्पष्ट बोलते. मला तिकिट देऊ अथवा न देऊ. मी लढणार म्हणजे लढणार, हे मी २०१९ ला पक्षाला सांगून टाकलं होतं. मी लढले असते, तर एवढीच मत घेतली असती या पक्षातसुद्धा. कारण इतर पक्ष असतात आपल्याला साथ द्यायला, असे नवी मुंबईच्या भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले. (I'm not afraid of anyone: Manda Mhatre)

विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान नवी मुंबईत करण्यात आला. त्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाच्या आमदार म्हात्रे बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, ‘महिलांचा सन्मान होत असताना त्यांचे पद, त्याचे काम आणि त्यांचे कर्तृत्व ऐकले. ते ऐकून मला खूप आनंद झाला. पण हे काम करत असताना त्यांना किती संषर्घाला तोंड द्यावे लागते. त्याचा गेली तीस वर्षे झाले मी अनुभव घेतलेला आहे. त्या संघर्षात टिकून राहून निवडून येणे आणि येथेपर्यंत येणे मग तुम्ही आमचा सन्मान करून प्रोत्साहन देणे ही मोठी गोष्ट आहे. समाजाने दिलेल्या प्रोत्साहानामुळे आपला संघर्ष करण्याची शक्ती, ऊर्जा  मिळते. अशा कार्यक्रमामधून लोकांना आणि महिलांना एक चांगला संदेश देऊ शकतो.’ 

नवी मुंबईची जनता, इथले नागरिक जे माझ्यावर प्रेम करतात. पण कधी कधी काय होतं की आपल्याच घरातील माणसं म्हणजे आपल्याच पक्षातील माणसं एखादी स्त्री चांगलं काम करायला लागली की त्यांना भीती निर्माण होते. अशी भीती निर्माण झाली की मग फोटो टाकायचे नाहीत, कार्यक्रमाला बोलवायचे नाही, असे प्रकार घडतात. जेव्हा अशी भीती निर्माण होते, तेव्हा समजायचे की आपलं कार्य चांगलं आहे. लक्षात घ्या भगिनींनो, जेव्हा तुमचा फोटो टाकला जात नाही, तुम्हाला बोलावले जात नाही, तेव्हा ओळखायचे की तुमचं कार्य चांगलं आहे आणि त्याची धडक त्यांना भरली आहे. त्यामुळे काम करत राहा, फळाची अपेक्षा ठेवायची नाही. झाड लावल्यानंतर पाच ते दहा वर्षांनंतर फळ येतं, असेही आमदार म्हात्रे म्हणाल्या.

Related Stories

No stories found.