राज ठाकरेंचा तीन दिवस पुण्यात मुक्काम ; पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेणार 

राज ठाकरे आज कसबा, पर्वती आणि हडपसर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेणार आहेत.
राज ठाकरेंचा तीन दिवस पुण्यात मुक्काम ; पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेणार 
1Sarkarnama_20Banner_20_202021_07_20T153847.413.jpg

पुणे : आगामी महानगरपालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील मनसे mns पदाधिकाऱ्यांची नवी कार्यकारिणी तयार करण्यासाठी राज ठाकरे  raj thackeray पुणे दौऱ्यावर आहेत. आज सकाळीच राज ठाकरे  raj thackeray पुणे शहरातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्यासाठी उपस्थित आहेत. राज ठाकरे आज कसबा, पर्वती आणि हडपसर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेणार आहेत.

राज ठाकरे 2 ऑगस्टपर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. गेल्याच आठवड्यात राज ठाकरे यांनी पुणे दौरा केला होता. राज ठाकरे हे ता. 19, 20 आणि 21 जुलै अशा तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरेंचा पुढचा पुणे दौराही ठरला होता. आठ दिवसांनी राज ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी दिली होती.

नवी पेठेतील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात ते शाखाध्यक्षांच्या मुलाखती घेणार आहेत. तसेच नवीन शाखाध्यक्षांच्या नियुक्त्या करणार आहेत. या दौऱ्यात ते एका दिवसात तीन मतदारसंघाचा आढावा म्हणजे तीन दिवसांत 9 मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे पुण्यातील मनसे सैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) आजपासून नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. ते दुपारपर्यंत नाशिकला पोहोचणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे आढावा घेणार असल्याचे समजते.  अमित ठाकरे हे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. नाशिक शहरातील मनसेची परिस्थिती,विविध वार्डांची स्थिती याचा आढावा अमित ठाकरे घेणार आहेत. त्यानंतर त्याचा अहवाल ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवणार आहेत.
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in