ठाकरे सरकारची बदनामी करणं एसटी कर्मचाऱ्याला पडलं महागात - Suspension of Pravin Ladhi from Yavatmal Depot-mm76 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

ठाकरे सरकारची बदनामी करणं एसटी कर्मचाऱ्याला पडलं महागात

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 जुलै 2021

यवतमाळ आगारातील प्रविण लढी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

यवतमाळ : ठाकरे सरकारची बदनामी करणं एका एसटी कर्मचाऱ्यांला महागात पडलं आहे. याप्रकरणी त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यवतमाळ आगारातील प्रविण ज्ञानेश्वर लढी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

शिवसेनेतल्या बंडखोरीमागे राष्ट्रवादीच ; पुरावे असल्याचा आढळरावांचा गैाप्यस्फोट

शिवसेनेचे नेत, परिवहन मंत्री अनिल परब आणि महाविकास आघाडी सरकार विरोधात प्रविण ज्ञानेश्वर लढी यांनी व्हॅाट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. ''महावसुली खंडणीखोर चोरटोळी अंबानीच्या घराशेजारी स्फोटके ठेवायला ड्रायव्हर मिळाला. ऑक्सीजन टँकरसाठी ड्रायव्हर मिळत नाही. 100 कोटी वसुली सरकार.'' अशी पोस्ट लढी यांनी व्हॅाट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती.

याप्रकरणी करण्यात आलेल्या तपासामध्ये सहकार्य करत नसल्यचा ठपकाही लढी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ता. 20 जुलै 2021 पासून लढी यांचं एसटीमधून निलंबन करण्यात आलं आहे. या कालावधीत त्यांना नियमांप्रमाणे निवार्ह भत्ता दिला जाणार आहे. निलंबन कालावधीत लढी यांनी यवतमाळ आगारामध्ये दररोज हजेरी लावावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.  यवतमाळ आगारातील एस. एस राठोड यांनी दिलेल्या अहवालानंतर लढी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

आता SIT करणार परमबीर सिंग प्रकरणाचा तपास

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या प्रकरणाचा तपास एसआयटी करणार आहे. त्यासाठी पोलिस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली एसआटीची स्थापना करण्यात आली आहे. मुंबईत दाखल दोन गुन्ह्यांमध्ये परमबीर सिंग यांच्या सहभागाबाबत ही एसआयटी तपास करणार आहे. 
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख