शिवसेनेतल्या बंडखोरीमागे राष्ट्रवादीच ; पुरावे असल्याचा आढळरावांचा गैाप्यस्फोट

जूनच्या पहिल्या आठवडय़ात हे बंडखोर सदस्य पवारांना त्यांच्या दालनात भेटले. त्याचे पुरावे उपलब्ध आहेत.
Sarkarnama Banner - 2021-07-28T083119.647.jpg
Sarkarnama Banner - 2021-07-28T083119.647.jpg

राजगुरूनगर :  खेड पंचायत समितीत Khed Panchayat Samiti शिवसेनेच्या सहा सदस्यांनी केलेल्या बंडखोरीमागे राष्ट्रवादी कॉंग्रेसच असून दिलीप मोहितेंसोबत बंडखोर उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawarव प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनाही बंडखोर भेटल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत, असा गौप्यस्फोट माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील Shivajirao Adhalrao Patil यांनी केला. 

उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आतातरी आघाडी धर्म पाळून, डांबून धरलेले आमचे पंचायत समिती सदस्य ताब्यात द्यावेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. बंडखोर सदस्यांचा पवारांसोबतचा फोटोच त्यांनी सरकारनामाला दिला. खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकरांवरील अविश्वास ठराव उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रद्दबातल ठरविला असून अविश्वास ठरावावर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबत प्रतिक्रिया देताना आढळराव पाटील बोलत होते. 

आढळराव म्हणाले, 'शिवसेनेच्या बंडखोर सदस्यांनी २४ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला. तो ठराव दाखल करण्याच्या एक तास आधी ते सदस्य पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अजित पवार यांच्यासोबत होते.  आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यादरम्यान साधारणतः जूनच्या पहिल्या आठवडय़ात हे बंडखोर सदस्य पवारांना त्यांच्या दालनात भेटले. त्याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यानंतर त्या सदस्यांना घेऊन मोहिते जयंत पाटलांना भेटले. त्यानंतर पाटील व मोहिते हे सुभाष देसाई यांना भेटले व तुमचे खासदार म्हणजे मी खोटे बोलत आहे.  सदस्यांच्या बंडखोरीशी राष्ट्रवादीचा संबंध नाही, असे सांगितले. प्रत्यक्षात सदस्य त्यांच्याच ताब्यात होते.' 

आता न्यायालयाने निकाल दिल्यावर तरी त्यांनी आघाडीधर्म पाळून त्यांच्याकडे ओलीस ठेवलेले सदस्य आमच्या ताब्यात द्यावेत. त्यातील काही स्वतःच्या मर्जीने आलेत, असे म्हणतील. पण त्याला अर्थ नाही. अशा बतावण्या राजकारणात चालत असतात.  खरेतर ते सदस्य त्यांनी बळजबरीने त्यांच्याकडे डांबून ठेवले आहेत. त्यांना कोठेही बाहेर सोडले जात नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. संघर्ष वाढवायचा नसेल, तर सदस्यांना आमच्या ताब्यात द्यावे, असे आढळराव म्हणाले. 


 न्यायालयातचा निर्णय प्रशासकीय त्रुटीसंदर्भात आहे. अविश्वास ठरावासाठी पुरेसा वेळ दिला गेला नाही, असे न्यायालयाचे मत आहे. तो निर्णय आम्हाला मान्य आहे. आता पुन्हा अविश्वास ठरावाला सामोरे जाताना सदस्य त्यांच्या बुद्धीला पटेल तो निर्णय घेतील. त्यांना मारहाण, दमबाजी झाली. त्यांच्यावर खोट्या केसेस केल्या. त्यामुळे ते दहाजण एकत्र आहेत. ते तसेच राहिले, तर अविश्वास मंजूर होऊ शकतो. पण तो त्यांचा निर्णय असेल. 
दिलीप मोहिते, आमदार, खेड 

शिल्पा राजवर ओरडली.. म्हणाली, ''तुला हे सगळं करण्याची काय गरज होती''
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्रावर अश्लील चित्रपट तयार करणे, त्यांना ओटीटी प्लॅटफाँर्मवर प्रदर्शित करण्याचा आरोप आहे. 
Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com