शरद पवारांचा सल्ला योग्यच..पण मी दौरा करणार!

आम्ही गेल्यामुळे शासकीय यंत्रणा जागी होते.
4Devendra_20Fadanavis_20_20Sharad_20Pawar.gif
4Devendra_20Fadanavis_20_20Sharad_20Pawar.gif

मुंबई : राज्यातील पुरग्रस्तांसाठी विविध पातळीवरुन मदतीचा ओघ सुरु झाला आहे.  ''मोठ्या नेत्यांनी दौरे करू नयेत. यंत्रणा आपल्या भोवती ठेवणे योग्य नाही. ज्यांचा त्या भागात संबंध नाही त्यांनी दौरे टाळावेत, कारण नसताना दौरे करुन, अडचण निर्माण करुन नये. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे. 

यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले की, नेत्यांनी शासकीय यंत्रणेवर ताण पडणार नाही असे दौरे करावेत, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.  पवाराचा सल्ला योग्यच आहे.  आम्ही गेल्यामुळे शासकीय यंत्रणा जागी होते. विरोधी पक्षनेता म्हणून मी दौरा करणार आहे.  

फडणवीस म्हणाले की, पूर परिस्थिती ही गंभीर आहे, नवीन आव्हाने आहेत, ड्रायव्हर्जन चॅनेल करून पाणी दुष्काळ असलेल्या ठिकाणी वळवता येते का याबाबत राज्य सरकारने यावर काम करावे याचा फायदा होईल. राज्यसरकार जिथे कमी पडतंय तिथे आम्ही दाखवत आहोत. विसर्ग कसा वाढवता येईल यावर प्रयत्न केला पाहिजे. 

आज मुंबई भाजप आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं कोकणात 9 ट्रक माल पाठवण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली. यात प्लॅस्टिकच्या चटया, घरगुती वापराच्या वस्तू, सॅनीटरी पॅडपासून सगळं असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्ही रोज काहीना काही पाठवण्याचा प्रयत्न करु. आम्ही जेव्हा कोकणाचा दौरा केला तेव्हा हे लक्षात आलं की तिथे घरात किंवा दुकानात काहीच उरलेलं नाही अशी स्थिती आहे. तिथली गरज ओळखून आवश्यक असणारी सामग्री आम्ही पाठवत आहोत, असं फडणवीस म्हणाले.

 
राज्यपाल भरतसिंह कोश्यारी यांचा दौरा हा राष्ट्रपतींच्या सूचनेनुसार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यपालांकडे फोन करुन राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी चार प्रमुख पक्षांच्या एका आमदार किंवा खासदाराला बोलावलं होतं. मात्र, सत्ताधारी पक्षातील नेते राज्यपालांसोबत आले नाहीत. ते का आले नाहीत मला माहिती नाही, असे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस आहे. त्याना मी फोनवर शुभेच्छा दिल्या आहेत, असे फडणवीस म्हणाले. 
Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com