पंडीत नेहरू यांच्याबद्दल राज्यपाल नक्की काय म्हणाले? 

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काल जवाहर लाल नेहरु यांच्यावर टीका केली.
Sarkarnama Banner - 2021-07-27T111106.873.jpg
Sarkarnama Banner - 2021-07-27T111106.873.jpg

मुंबई : कारगिल संघर्षांतील योध्दयांचा सत्कार करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नेहरू Pandit Nehru यांची शांतिदूत बनण्याची मनीषा देशाच्या सुरक्षेसाठी घातक ठरली असे मत मांडले. त्यावरून वाद पेटला आहे. कारगील विजय दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी Bhagat Singh Koshyari बोलत होते. 

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काल देशाचे पहिले पंतप्रधान जवाहर लाल नेहरु यांच्यावर टीका केली. कोश्यारी म्हणाले,  "जवाहर लाल नेहरु स्वतःला शांतीदूत समजत होते. त्यामुळे त्यांच्या या धोरणामुळे देशाला त्यांची किमत चुकवावी लागली.''

राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, देशाची प्रगती आणि स्वातंत्र्य लढ्यात पंडित नेहरु यांचे योगदान मोठे आहे. पण ते स्वतःला शांतीदूत समजत होते. त्यांच्या या शांतीच्या धोरणामुळे भारताला त्याची किंमत चुकवावी लागली. त्यामुळे देशाचे नुकसान झाले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्वीची सरकारे राष्ट्रीय सुरक्षेबाबत गंभीर नव्हती. वाजपेयी यांनी अणूचाचणी केली, त्यांच्यापूर्वीच्या सरकराने अशी भूमिका घेतली नाही. देशाच्या सुरक्षेबाबत वाजपेयी यांच्याशिवाय कोणत्याही पंतप्रधानांनी लक्ष दिले नाही. जवाहर लाल नेहरु यांच्या कार्यकाळात देश कमजोर होता. देशाच्या सुरक्षीततेबाबत जे पन्नास वर्षात झाले नाही ते आज होत आहे.

अतिवृष्टीतील मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार नऊ लाखांची मदत
सातारा : राज्यात मागील आठवड्यात दरडी कोसळून व पुरामुळे 180 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक 91 जण रायगड जिल्ह्यात मृत पावले आहेत. त्यानंतर सातारा जिल्ह्यात 41 जणांचा, रत्नागिरी 21, ठाणे 12, कोल्हापूर 7, मुंबई 4, पुणे व सिंधुदूर्ग जिल्ह्यात प्रत्येकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 3 हजार 248 जनावरंही दगावली आहे. सुमारे 17 हजार 300 कोंबड्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती राज्य शासनाकडून देण्यात आली. जवळपास 30 अजूनही बेपत्ता असून 50 ते 55 जण जखमी झाले आहेत. 

निर्बंध कमी करण्याबाबत दोन दिवसांनी मुख्यमंत्री निर्णय घेणार 
जालना : राज्यातील ज्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट कमी आहे, त्या जिल्ह्यातील निर्बंध कमी करण्यासाठी टास्क फोर्स अभ्यास करीत आहे. हा अहवाल दोन दिवसांनी आल्यानंतर निर्बंध कमी करायचे की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray घेतील असे आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनी सांगितलं. टोपे यांच्या हस्ते जालन्यात १०० खाटाच्या कोविड रुग्णालयाच उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com