पुण्यातील दुकाने, हॉटेल ७ पर्यंत सुरु राहणार ? सोमवारी होणार शिक्कामोर्तब 
1Ajit_20Pawar_20F.jpg

पुण्यातील दुकाने, हॉटेल ७ पर्यंत सुरु राहणार ? सोमवारी होणार शिक्कामोर्तब 

दोन्ही डोस झालेल्यांना बाहेर पडता येईल का ? याबाबतीत विचार सुरु असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

पुणे :  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी पुणे जिल्ह्या प्रशासनाने तयारी केली आहे. पुणे Pune शहराचा पॉझिटिव्हीटी रेट  ३.९ वर आला आहे. पुण्यातील हॉटेल, दुकानांची वेळ ५ ऐवजी ७ पर्यंत करा, अशा सूचना आलेल्या आहेत. याबाबतचा सकारात्मक निर्णय सोमवारी होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार  Ajit Pawar यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. 

कोरोना प्रतिबंधत लसीचे  Corona Vaccine दोन्ही डोस झालेल्यांना बाहेर पडता येईल का ? याबाबतीत विचार सुरु असल्याचे अजित पवार यांनी आज पुण्यात सांगितले. अजित पवार म्हणाले की, राज्यात सध्या विविध ठिकाणी पाऊस सुरू असून दगडी कोसळल्याच्या घटना घडत आहेत. कोकण, कोल्हापूर, पुणे जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका बसला आहे. राज्यातील ९० हजार नागरिकांचे सुरक्षीत स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. एनडीआरएफचे २१ पथक सध्या काम करीत आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. 

राणे, लाड यांना भाजपनं दिली नवी जबाबदारी 
मुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास फेब्रुवारी २०२२ मध्ये होणारी निवडणूक घेण्यावर मुंबई महापालिका ठाम आहे. राज्य निवडणूक आयोगानेही पालिका यंत्रणेला निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. 

राज कुंद्रा याच्या 'प्लॅन बी'तून नवीन धक्कादायक खुलासा
मुंबई : उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा  Raj Kundra याला अश्लील चित्रपट बनवणे आणि वेगवेगळ्या माध्यमातून विकण्याच्या आरोपाखाली मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. कुंद्राच्या येस बँकेमध्ये ऑनलाइन बेटिंग आणि कसिनो गेमिंग करणाऱ्या मरक्यूरी इंटरनॅशनल कंपनीच्या युनायटेड बँक ऑफ आफ्रिका या खात्यातून मोठ्या प्रमाणात पैसे आल्याचे दिसून आले.  

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in