राज कुंद्रा याच्या 'प्लॅन बी'तून नवीन धक्कादायक खुलासा

राजच्या मोबाइलमधून केनरिन कंपनीसोबतचे आर्थिक व्यवहाराबाबतचे मेसेज मिळाले आहेत.
2Sarkarnama_20Banner_20_202021_07_20T115231.332.jpg
2Sarkarnama_20Banner_20_202021_07_20T115231.332.jpg

मुंबई : उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा  Raj Kundra याला अश्लील चित्रपट बनवणे आणि वेगवेगळ्या माध्यमातून विकण्याच्या आरोपाखाली मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे.कुंद्राच्या येस बँकेमध्ये ऑनलाइन बेटिंग आणि कसिनो गेमिंग करणाऱ्या मरक्यूरी इंटरनॅशनल कंपनीच्या युनायटेड बँक ऑफ आफ्रिका या खात्यातून मोठ्या प्रमाणात पैसे आल्याचे दिसून आले. त्यामुळे कुंद्रा हा हॉटशॉट अँपद्वारे कमावलेले पैसे इंटरनॅशनल कंपनी मार्फत अथवा ऑनलाईन बॅटिंग द्वारे प्राप्त करीत होता, असे तपासात समोर आले आहे. त्यांचा प्लान B कोणता होता हे तपासात समोर आले आहे. Raj Kundra Plan B revealed in the investigation

 राजच्या मोबाइलमधून  केनरिन कंपनीसोबतचे आर्थिक व्यवहाराबाबतचे मेसेज मिळून आले आहेत. तर फरार आरोपी प्रदीप बक्षी यांच्या सोबतच्या  मेसेजमध्ये 119 मुव्हींची लिस्ट सापडली आहे.  राज कुंद्राकडे काम करणारा आरोपी उमेश कामत याला पून्हा कामावर घेतल्याने कटेंन्ट हेड म्हणून काम करणाऱ्या महिलेने कुंद्राला मेसेज करून असुरक्षीत वाटत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली.

हाँटशाँट अँपमार्फेत कुंद्राने आँगस्ट 2019 ते नोव्हेंबर 2019 मध्ये दर महिन्याला 4 ते 10 हजार ब्रिटिश पौंड सर्व खर्च वजा करून नफा होत होता. हाँर्टशाँर्ट वरील केटेन्ट हे अश्लील असल्यानेच अँपल आणि गुगल अँपने स्विकारले नाही. म्हणून राँयन थाँर्पने जानेवारी 2021 मध्ये हाँर्टशाँर्ट सारखे बाँलीफेम हे अँप बनवले होते. आणि हाच होता 'प्लान B'

कुंद्राने एका कंपनीच्या माध्यमातून 30 ते 40 अॅप्सची निर्मिती केलेली आहे. या कंपन्यांवर काही दिवस तो स्वतः संचालक राहायचा आणि नंतर राजीनामा देऊन विश्वासातील व्यक्तीला तिथे नेमायचा.  त्याने ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या शेकडो अश्लील व्हिडिओंचा डेटा मुंबई पोलिसांच्या हाती लागला आहे. या प्रकरणात आणखी 2 मॉडेल गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत.
 न्यायालयाने काल राज कुंद्राच्या पोलीस कोठडीत ७ दिवसांची वाढ केली आहे. अश्लील फिल्म बनवून विकल्या आणि मिळालेल्या पैशातून बेटींग केली असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे राज कुंद्राच्या दोन बॅंक अकाउंटचीही पडताळणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. राज कुंद्रा आणि दुसरा आरोपी रायन थॉर्प यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

कर्नाटक मुख्यमंत्रीपदासाठी भाजपची चाचपणी सुरु ; या नावाची चर्चा  
बंगळूर : कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना पदावरुन हटविण्यासाठी हालचाली सुरू असताना त्यांच्या जागी भाजप (BJP)कोणाची वर्णी लावणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com