राणे, लाड यांना भाजपनं दिली नवी जबाबदारी 

मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपनेही जोरदार तयारी सुरु केली आहे.
Sarkarnama Banner - 2021-07-24T115048.915.jpg
Sarkarnama Banner - 2021-07-24T115048.915.jpg

मुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास फेब्रुवारी २०२२ मध्ये होणारी निवडणूक घेण्यावर मुंबई महापालिका ठाम आहे. राज्य निवडणूक आयोगानेही पालिका यंत्रणेला निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आगामी निवडणुकीसाठी तयारी लागले आहे. मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपनेही जोरदार तयारी सुरु केली आहे. Prasad Lad Nitesh Rane appointed bjp Mumbai District Guardian

भाजपने आमदार प्रसाद लाडPrasad Lad, आमदार नितेश राणे Nitesh Rane यांची भाजप मुंबई महापालिका bjp Mumbai निवडणूक कोअर कमिटीच्या माध्यमातून दक्षिण मध्य मुंबई जिल्हा पालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दक्षिण मध्य मुंबई प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, आमदार तमिल सेल्वन, आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर आदी उपस्थित होते.    

मागील २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या वादांमुळे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजप यांच्यात केंद्रात, राज्यात व पालिकेत काडीमोड झालेला आहे. त्यामुळे भाजपला मुंबई महापालिकेची सत्ता एकहाती मिळवायची आहे. मागच्यावेळी त्यांची संधी हुकली. त्यामुळे भाजप आगामी निवडणुकीसाठी आतुर झाले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. मनसे, समाजवादी, राष्ट्रवादी यांनी सुद्धा मुंबई महापालिका निवडणुका लढण्यासाठी तयारी सुरू केली आहे.  

राज कुंद्रा याच्या 'प्लॅन बी'तून नवीन धक्कादायक खुलासा
मुंबई : उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा  Raj Kundra याला अश्लील चित्रपट बनवणे आणि वेगवेगळ्या माध्यमातून विकण्याच्या आरोपाखाली मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे.कुंद्राच्या येस बँकेमध्ये ऑनलाइन बेटिंग आणि कसिनो गेमिंग करणाऱ्या मरक्यूरी इंटरनॅशनल कंपनीच्या युनायटेड बँक ऑफ आफ्रिका या खात्यातून मोठ्या प्रमाणात पैसे आल्याचे दिसून आले. त्यामुळे कुंद्रा हा हॉटशॉट अँपद्वारे कमावलेले पैसे इंटरनॅशनल कंपनी मार्फत अथवा ऑनलाईन बॅटिंग द्वारे प्राप्त करीत होता, असे तपासात समोर आले आहे. त्यांचा 'प्लॅन बी' कोणता होता हे तपासात समोर आले आहे. 
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com