पुणे जिल्ह्यातील या बड्या नेत्याला व्हायचं होत अभिनेता..

राजकारणात अनेक मात्तबर नेते असे आहेत जे दिलखुलास म्हणून ओळखले जातात.
Sarkarnama - 2021-09-16T132317.974.jpg
Sarkarnama - 2021-09-16T132317.974.jpg

पुणे :  सामाजिक आणि राजकीय जीवनात काम करत असताना अनेक नेते आपले छंद जोपासतात पण अनेकांना आपल्या मनाला मुरड घालावी लागते. पण ती खंत मात्र सर्वांनाच सतावते. आणि मग कधी गप्पांमधून आपले नेते ती बोलून दाखवतात. पुणे जिल्ह्यातील एका माजी मंत्र्यांनी आपल्या अनोख्या छंदाविषयी सांगितले.  

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मात्तबर नेते असे आहेत जे दिलखुलास म्हणून ओळखले जातात. राजकारणात आणि समाजकारणात वावरताना या नेत्यांनी आपल्या आवडी निवडीला आणि आपल्या आवडत्या छंदाला बगल दिली असली तरी तो छंद आणि आवड अनेक नेत्यांच्या मनात आजही घर करून आहे. माजी मंत्री  हर्षवर्धन पाटील  (Harshvardhan Patil) यांनी आपल्या मनातील इच्छा बोलावून दाखवली. 

परमबीर सिंह यांना उच्च न्यायालयाचा दणका ; याचिका फेटाळली 
'जर नेता नसतो तर नक्कीच अभिनेता असतो' हे विधान करून हर्षवर्धन पाटलांनी आजही ते चित्रपटांशी कसे कनेक्ट आहेत हे दाखवून दिले. सकाळच्या एका मुलाखतीत हर्षवर्धन पाटील यांनी ही माहिती दिली. 

पेंग्वीनसाठी पंधरा कोटी ? कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी ही उधळपट्टी 
मुंबई  :  मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना भाजप नेते, आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पत्र लिहिलं आहे. ''वाघांची देखभाल मनपा कर्मचारी करु शकतात, मग पेंग्वीनच्या 15 कोटींचा ठेका कुणासाठी? असा सवाल राणेंनी महापौरांना पत्रातून विचारला आहे. ''राणीचा बाग हा सामान्य मुंबईकर कुटुंबातील लहान मुलांसाठी आईवडीलांकडे हट्ट करून जाण्याचे ठिकाण होते. पण एका ‘पेंग्वीन’च्या बालहट्टामुळे त्यांचे हक्काचे खेळण्याचे-विरंगुळ्याचे स्थानही आपण अव्वाच्या सव्वा तिकीट दर लावून हिरावून घेतले,'' असा आरोप राणेंनी पेडणेकरांवर केला आहे. 
Edited by : Mangesh Mahale  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com