पेंग्वीनसाठी पंधरा कोटी ? कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी ही उधळपट्टी 

किशोरी पेडणेकर यांना भाजप नेते, आमदार नितेश राणे यांनी पत्र लिहिलं आहे.
Sarkarnama - 2021-09-16T111433.341.jpg
Sarkarnama - 2021-09-16T111433.341.jpg

मुंबई  :  मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना भाजप नेते, आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पत्र लिहिलं आहे. ''वाघांची देखभाल मनपा कर्मचारी करु शकतात, मग पेंग्वीनच्या 15 कोटींचा ठेका कुणासाठी? असा सवाल राणेंनी महापौरांना पत्रातून विचारला आहे. ''राणीचा बाग हा सामान्य मुंबईकर कुटुंबातील लहान मुलांसाठी आईवडीलांकडे हट्ट करून जाण्याचे ठिकाण होते. पण एका ‘पेंग्वीन’च्या बालहट्टामुळे त्यांचे हक्काचे खेळण्याचे-विरंगुळ्याचे स्थानही आपण अव्वाच्या सव्वा तिकीट दर लावून हिरावून घेतले,'' असा आरोप राणेंनी पेडणेकरांवर केला आहे. 

भाजपचे आमदार नितेश राणे आपल्या पत्रात म्हणतात....
आपण मुंबईच्या प्रथम नागरिक आहात. ही सन्मानाची बाब असली पाहिजे. पण आपण घेतलेल्या प्रेस कॅान्फरन्समध्ये ज्या पद्धतीने आपण मुंबईकरांची दिशाभूल केलीये, हे अत्यंत निंदनीय आहे असो, आम्हीही समजू शकतो की ‘पेंग्वीन’च्या दबावामुळे आपण खोट्याला खरं सिद्ध करण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला, महापालिकेने प्रकाशीत केलेल्या आकडेवारीप्रमाणे पर्यटकांची संख्या

२०१७ ते २०१८ या आर्थिक वर्षात १७ हजार ५७ हजार ०५९ होती पण मागील दोन वर्षांमध्ये पर्यटकांचा आकडा कमी झाला, आता ती संख्या १० लाख ६६ हजार ०३६ वर आलीय. त्यामुळे तीन वर्षांत सात लाख पर्यटकांची संख्या घटलेली आहे.

नेहरुंनंतर वर्चस्व गाजवणारे मोदी तिसरे नेते ;  ममता बॅनर्जी निर्भीड महिला नेत्या
मुळात महसूल वाढला म्हणून आकर्षण वाढले असा भ्रमीत करण्याचा प्रयत्न आपण केला. पण वास्तवामध्ये २०१० पर्यंत या राणीबागेतील प्रवेश शुल्क हे ५ रुपये होते. पण त्यानंतर हे शुल्क आपण ५ रूपयांवरून थेट ५० रूपयांवर नेलं. दोन प्रौढ आणि बारा वर्षाखाली दोन मुले आदींसाठी १०० रुपये आणि एका प्रौढ व्यक्तीला ५० रुपये अशाप्रकारचे अजब शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे जो महसूल वाढलेला आहे, तो या वाढीव शुल्कामुळे आहे पर्यटकांची संख्या किंवा आकर्षण वाढल्यानी नाही. 

ठाकरेंचा रेड्डींना फोन ; तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी  
एवढंच नाही तर शक्ती आणि करिष्मा ही वाघाची जोडीही आकर्षण असल्याचे आपण सांगितलंत पण जर वाघाची देखभाल महापालिका कर्मचारी स्वतःकरु शकतात तर पेंग्वीनची का नाही ? हा पंधरा कोटीचा पेंग्वीन देखभालीचा ठेका कोणासाठी ? 

राणीचा बाग हा सामान्य मुंबईकर कुटुंबातील लहान मुलांसाठी आईवडीलांकडे हट्ट करून जाण्याचे ठिकाण होते. पण एका ‘पेंग्वीन’च्या बालहट्टामुळे त्यांचे हक्काचे खेळण्याचे-विरंगुळ्याचे स्थानही आपण अव्वाच्या सव्वा तिकीट दर लावून हिरावून घेतले. इतकेच नाही तर लहान मुलांना पाहता यावं म्हणून हा पेंग्विन कक्ष बनवला पण मुंबईतील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करताना राणीबागचे दरवाजे  मुलांसाठी खुले केले गेले नाहीत मग कुठल्या बाळाचा छंद पुरवण्यासाठी ही कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होतेय?  हे तरी सांगा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com