ठाकरेंचा रेड्डींना फोन ; तिरुपती ट्रस्टच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकरांची वर्णी  

तिरुमला तिरूपती ट्रस्टच्या सदस्यपदी नेमणूक होण्यासाठी देशभरातून अनेक जण इच्छुक असतात,
1milind_20narvekarfff.jpg
1milind_20narvekarfff.jpg

मुंबई : प्रसिद्ध देवस्थान तिरुमला तिरूपती ट्रस्टच्या सदस्यपदी मुख्यमंत्र्याचे निकटवर्तीय, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांची वर्णी लागली आहे. देशभरातून २४ जणांची तिरुमला तिरूपती ट्रस्टच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्रातून या यादीत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना स्थान मिळाले आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रीमंत असलेल्या तिरुमला तिरूपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची यादी काल आंध्रप्रदेश सरकारने जाहीर केली आहे.

तिरुमला तिरूपती ट्रस्टच्या सदस्यपदी नेमणूक होण्यासाठी देशभरातून अनेक जण इच्छुक असतात, यासाठी मोठी चढाओढ असते. अनेक राज्याचे मुख्यमंत्री हे आंधप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून प्रयत्न करीत असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकरांच्या यांच्या नावाची शिफारस मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (Jagmohan Reddy) यांच्याकडे केली. त्यानंतर नार्वेकर यांची या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तिरूपती देवस्थान ट्रस्टने नव्या सदस्यांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. 

मिलिंद नार्वेकर हे सध्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या मुंबई प्रीमिअर लीग (MPL) गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी आहेत.  त्यांची आता तिरुमला तिरूपती ट्रस्टच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याने ते नाव देशपातळीवर पोहचले आहे.  

नार्वेकरांना मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे  (Uddhav Thackeray) पीए (स्वीय सहाय्यक) म्हणून ओळखलं जातं. कोकणातील दापोलीत, समुद्रकिनारी असलेला मिलिंद नार्वेकरांचा बंगला जमीनदोस्त करण्यात आला आहे.  नियमांचं उल्लंघन करून, अवैधरित्या हा बंगला बांधल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यामुळे गेल्याकाही दिवसांपासून मिलिंद नार्वेकर चर्चेत आहेत.

अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा
मुंबई  : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सोनू सूद (sonu sood) राजकारणात येऊन निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे आयकर विभाग त्यांच्या संपत्तीचा सर्व्हे केला जात आहे. आयकर विभागाने (Income Tax Department) सोनू सूदच्या घर, कार्यालय आदी सहा ठिकाणी सर्व्हे केला. मात्र सोनू सूदच्या घर किंवा कार्यालयातील कोणत्याही वस्तू वा कागदपत्र जप्त करण्यात आलेले नाहीत.सोनू सूद अलीकडेच दिल्ली सरकारने प्रस्तावित केलेल्या ‘देश के मेंटॉर’ कार्यक्रमाचा ब्रँड अॅम्बेसेडर बनला आहे. 

  Edited by : Mangesh Mahale  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com