नेहरुंनंतर वर्चस्व गाजवणारे मोदी तिसरे नेते ;  ममता बॅनर्जी निर्भीड नेत्या

राजकारणात वर्चस्व गाजवणारे नरेंद्र मोदी तिसरे नेते आहेत. त्यानंतर कोणीही नाही.
Sarkarnama - 2021-09-16T101342.861.jpg
Sarkarnama - 2021-09-16T101342.861.jpg

नवी दिल्ली :  जगप्रसिद्ध मॅगझिन 'टाइम'ने  २०२१ या वर्षातील जगातील प्रभावशाली व्यक्तींची यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. या यादीत कलाकार, नेते, पायनियर, चिन्ह, टायटन्स आणि संशोधक यांचाही समावेश आहे.  जगातील विविध क्षेत्रातील अनेक प्रभावशाली लोकांचाही समावेश आहे. टाइम मॅगझिनची ही यादी सर्वात शक्तिशाली आणि विश्वासार्ह यादी मानली जाते. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Narendra Modi) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनवाला (Adar Poonawalla) यांचा समावेश आहे. 

नेहरुनंतर मोदी तिसरे नेते
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टाइम प्रोफाइलमध्ये म्हटलं  आहे की, ''स्वतंत्र्य राष्ट्र म्हणून भारताच्या ७४ वर्षांमध्ये तीन प्रमुख नेते होते. यामध्ये जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे. देशाच्या राजकारणात वर्चस्व गाजवणारे नरेंद्र मोदी तिसरे नेते आहेत. त्यानंतर कोणीही नाही.''

ममता या स्वतःच एक पक्ष
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रोफाइलमध्ये ;टाइम'ने म्हटलं आहे की, ६६ वर्षीय ममता बॅनर्जी राजकारणात एक निर्भीड महिला नेत्या म्हणून जगासमोर आल्या आहेत. ममता बँनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केले नाही तर त्या स्वतः एक पक्ष आहेत.

या यादीत अमेरिका अध्यक्ष ज्यो बायडेन, उपाध्यक्षा कमला हॅरीस, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी आणि मेघन आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरादर यांचा समावेश आहे. याशिवाय पुतिनविरोधी कार्यकर्ते अलेक्सी नॅव्हलनी आणि रशियात अटक झालेली गायिका ब्रिटनी स्पीयर्स यांचाही या प्रभावशाली व्यक्तींच्या या यादीत स्थान देण्यात आले आहे. एलोन मस्कचे नावही ‘इनोव्हेटर्स’मध्ये समावेश आहे. या १०० प्रभावशाली लोकांची यादी ६ श्रेणींमध्ये 'टाइस'ने विभागली आहे.

ठाकरेंचा रेड्डींना फोन ; तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी  
मुंबई : प्रसिद्ध देवस्थान तिरुमला तिरूपती ट्रस्टच्या सदस्यपदी मुख्यमंत्र्याचे निकटवर्तीय, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांची वर्णी लागली आहे. देशभरातून २४ जणांची तिरुमला तिरूपती ट्रस्टच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्रातून या यादीत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना स्थान मिळाले आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रीमंत असलेल्या तिरुमला तिरूपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची यादी काल आंध्रप्रदेश सरकारने जाहीर केली आहे.
Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com