वडिलांनी घेतली केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट; तर मुलीची राज्यपालांशी चर्चा 

या भेटींबाबत राजकीय वर्तुळात मात्र चर्चा सुरू आहे.
Ankita Harshvardhan Patil meet to  Governor Koshiyari in Pune
Ankita Harshvardhan Patil meet to  Governor Koshiyari in Pune

इंदापूर (जि. पुणे)  ः आपण उपस्थित केलेले सर्व प्रश्न नागरिकांच्या हिताचे आहेत. आपण त्यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून प्राधान्याने हे प्रश्न सोडवू, अशी ग्वाही राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी दिली आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी दिली. (Ankita Harshvardhan Patil meet to  Governor Koshiyari in Pune)

दरम्यान, अंकिता यांचे वडिल माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत नवे केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती. त्यानंतर साधारण आठवडाभरानंतर पाटील यांच्या कन्या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता यांनी पुण्यात राज्यपाल कोशियारी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी नवीन सहकार मंत्रालयाबाबत शहा यांची भेट घेत चर्चा केली होती, तर त्यांच्या कन्या अंकिता यांनी विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यपालांशी चर्चा केली आहे. या भेटींबाबत राजकीय वर्तुळात मात्र चर्चा सुरू आहे.

अंकिता पाटील यांनी पुणे येथे राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. तसेच, त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी अंकिता पाटील यांनी राज्यपालांना अमृतमहोत्सवी स्वातंत्र दिनाच्याही शुभेच्छा दिल्या. 

एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नियुक्ती, अकरावी प्रवेश प्रक्रिया पारदर्शीपणे राबविणे, आभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशसंदर्भात पूर्व परीक्षांचे वेळापत्रक सुनिश्चित करून परीक्षा घेणे, संपूर्ण महाराष्ट्रासह पुणे ग्रामीण, इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांची सक्तीने केली जाणारी वीज कनेक्शन तोडणी तातडीने थांबवावी, अशी विनंती राज्यपाल कोशियारी यांना जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी केली.

राज्यपालांच्या भेटीसंदर्भात अंकिता पाटील म्हणाल्या की, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या कृषीपंपांची वीज तोडणी मोहीम सुरु आहे. मात्र, शेतकरी हे अजूनही कोरोना प्रादुर्भावामुळे बाजार भाव पडल्यामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. शेतकऱ्यांकडे पैसे उपलब्ध होतील, असे कोणतेही पीक सध्या शेतात नसल्याने शेतकरी वीज बिलाचे पैसे भरू शकत नाही, त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने शेती पंपांची वीज तोडणी मोहीम त्वरित थांबवणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी हे वीज कनेक्शन खंडित मोहिमेबद्दल गप्प आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत सुरू करण्याबाबत आपण लक्ष घालावे, अशी विनंती राज्यपाल कोशियारी यांना केली आहे. 

कोरोना व्हायरस डेल्टा प्लसचे पेशंट सापडत आहेत. काही भागात डेंगींचा प्रादुर्भावही वाढत आहे. ग्रामीण भागात गर्भवती महिलांना सकस आहार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मुलांच्या शिक्षणात अडचणी येत आहेत, आदी विषयांवरही या वेळी सविस्तर चर्चा झाल्याचे अंकिता पाटील यांनी या वेळी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com