आधी प्रबोधनकारांचं लिखाण वाचा! राज ठाकरेंना शरद पवारांचा सल्ला

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला', असं ठाकरे म्हणाले होते.
NCP Chief Sharad Pawar slams Raj Thackeray
NCP Chief Sharad Pawar slams Raj Thackeray

मुंबई : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला,' असं वक्तव्य करणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सल्ला दिला आहे. राज ठाकरे यांनी आधी प्रबोधनकार ठाकरे यांचं लिखाण वाचावं. हे लिखाणचं त्यांना योग्य रस्ता दाखवेल, असं पवार म्हणाले. (NCP Chief Sharad Pawar slams Raj Thackeray)

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली होती. ''देशाला विचार देणारा महाराष्ट्र आता यूपी- बिहारच्या पातळीवर घसरत चालला आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी समाजात जाती- जातीचे विष पेरले जात आहे. अलीकडे जातीचा मुद्दा हा त्या त्या समाजाच्या नेत्यांच्या आयडेंटिटीचा मुद्दा बनला आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला', असं ठाकरे म्हणाले होते. 

ठाकरे यांच्या या वक्तव्याबाबत पवारांनी आज पत्रकार परिषदेत त्यांना प्रत्यूत्तर दिलं. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. देशात वर्णव्यवस्था हजारो वर्षापासून आहे. राज ठाकरे यांनी वाचन करायला हवं,' असा टोला मलिक यांनी लगावला होता. 

''राष्ट्रवादी कॉंग्रेस शाहू - फुले - आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यांच्या ठरलेल्या धोरणानुसार आम्ही राजकारण करतो मात्र, राज ठाकरे यांना हे माहीत नसावे किंवा जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा म्हणून ते अशाप्रकारचे वक्तव्य करत आहे.  या देशात मनुवादी व्यवस्थेमुळे वर्णव्यवस्था निर्माण झाली आणि त्याअंतर्गत जातीव्यवस्था उभ्या राहिल्या. मात्र यामुळे जातीआधारावर अनेक वर्षे लोकांवर अन्याय होत राहिला हे राज ठाकरे यांना बहुतेक माहित नसावे,'' असंही मलिक म्हणाले होते. 

''छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी जातीव्यवस्था नष्ट करण्याचे काम केले. समता मुलक समाज घडवण्याचं काम केलं हेही राज ठाकरे यांना माहीत नसावे,'' असा उपरोधिक टोला लगावतानाच 'राज ठाकरे यांनी अज्ञानातून हे वक्तव्य केले असावे,' असं मलिक यांनी म्हटलं होतं. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com