जवळचा मित्र आज सोबत नसल्याची खंत : अजितदादांकडून आर. आर. पाटलांना अभिवादन 

आर. आर. आबांनी राबवलेलं प्रत्येक अभियान हे राज्यात लोकचळवळ बनलं आहे.
जवळचा मित्र आज सोबत नसल्याची खंत : अजितदादांकडून आर. आर. पाटलांना अभिवादन 
Deputy Chief Minister Ajit Pawar Tribute to R.  R. Patil on his birthday

मुंबई : ‘‘महाराष्ट्राच्या राजकारणातला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला माझा सहकारी, जवळचा मित्र आज आपल्यासोबत नाही, याची खंत, दु:ख कायम मनात राहणार आहे,’’ अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या जयंतीदिनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (Deputy Chief Minister Ajit Pawar Tribute to R.  R. Patil on his birthday)

आर. आर. पाटील यांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने उपमुख्यमंत्री पवार यांनी आबांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, राज्याचे लोकप्रिय नेतृत्वं, माजी उपमुख्यमंत्री (स्व.) आर. आर. पाटील ऊर्फ आबांना जयंतीदिनी भावपूर्ण आदरांजली. ग्रामीण विकासाची आस, तंटामुक्त समाजाचा ध्यास घेऊन आर. आर. आबांनी राबवलेलं प्रत्येक अभियान हे राज्यात लोकचळवळ बनलं आहे. पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त भरतीप्रक्रियेच्या आबांच्या निर्णयानं हजारो गरीब युवकांना पोलिस दलाची दारे खुली करुन दिली आहे. 

डान्सबार बंदी, गुटखाबंदी यांसारख्या त्यांच्या निर्णयाने महाराष्ट्राच्या कित्येक पिढ्या वाचवल्या आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्याचं काम आर. आर. आबांनी यशस्वीपणे केले आहे. शहरी, ग्रामीण भागातील प्रत्येकाला आदर असलेले, आपलेसे वाटणारे त्यांचे नेतृत्व होते. महाराष्ट्राच्या राजकारणातला, राष्ट्रवादी काँग्रेसमधील माझा सहकारी, जवळचा मित्र आज आपल्यासोबत नाही, याची खंत, दु:ख कायम मनात राहणार आहे. स्वर्गीय आर. आर. आबांच्या स्मृतींना जयंतीदिनी विनम्र अभिवादन, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

आर. आर. पाटील म्हणजे शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्व. सामान्य कार्यकर्त्याला नेहमीच प्रेरणादायी ठरेल, अशी त्यांची विधायक कारकीर्द राहिली आहे. संवेदनशील लोकनेते (स्व.) आर. आर. पाटील यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील (आबा) यांची आज जयंती. अतिशय कल्पक, मेहनती आणि प्रामाणिकपणे कर्तव्याला जागणारा संवेदनशील माणूस म्हणजे आबा! त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या अभिवादनात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in