पावविक्रेता मुलगा ते महापालिका आयुक्त : राजेश पाटील यांचा संघर्षमय प्रवास - Municipal Commissioner: Rajesh Patil's struggling journey | Politics Marathi News - Sarkarnama

पावविक्रेता मुलगा ते महापालिका आयुक्त : राजेश पाटील यांचा संघर्षमय प्रवास

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

आंतर राज्य प्रतिनियुक्तीवर बदलून आलेले ओडीशा केडरचे आयएएस अधिकारी राजेश पाटील यांनी आज पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.

पिंपरी : आंतर राज्य प्रतिनियुक्तीवर बदलून आलेले ओडीशा केडरचे आयएएस अधिकारी राजेश पाटील यांनी आज पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून त्यांनी सूत्रे हाती घेतली. आयुक्त म्हणून संत सेवालाल महाराज जयंती हा त्यांचा पहिला कार्यक्रम झाला. 

दरम्यान, संतोष पाटील यांच्या पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील बदलीनंतर गेल्या दोन महिन्यापासून रिक्त असलेल्या अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार आजच विकास ढाकणे यांनी स्वीकारला. तरीही तीनपैकी एक अतिरिक्त आयुक्तपद रिक्तच आहे. प्रवीण तुपे यांच्या स्वेच्छानिवृत्तीनंतर तेथे पालिका सेवेतील अधिकाऱ्यांची निुयुक्ती अद्याप झालेली नाही.

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील हर्डीकर हे महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतरही सव्वावर्ष आयुक्त म्हणून राहिले, हे विशेष. कोरोना काळात इतर सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. मात्र, टर्म पूर्ण होऊनही हर्डीकर पावणेचार वर्ष आयुक्त म्हणून राहिले.

एक एमबीबीएस डॅाक्टर जेव्हा आयपीएस बनून ठसा उमटवतो तेव्हा...

पाव विक्रेता ते आयएएस असा नवे आयुक्त पाटील यांचा प्रवास मोठा संघर्षमय व प्रेरणादायी आहे. २००५ ला ते सनदी अधिकारी झाले. खानदेशातील (जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील) ताडे हे त्यांचे गाव आहे.  त्यांचे कुटुंब कष्टकरी होते. स्वतः राजेश यांनी शेतमजुरीचे मिळेल ते काम करून, पाव-भाजीपाला विकून, ट्रॅक्टरवर मजुरी करून, विहिरी खोदून शिक्षण घेतलेले आहे. 

Valentine Day : पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते अन् किशोर रक्ताटे यांची प्रेमकहाणी 
 

आयएएस होण्यापूर्वी त्यांची २००० मध्ये भारतीय सांख्यिकी सेवा आणि हवाई दलात त्यांची निवड झाली होती. 'ताई, मी कलेक्टर व्हयनु!' हे त्यांचे अनुभवकथन म्हणजे एका अभावग्रस्त तरुणाचा संघर्षमय प्रवास आहे. त्यातून त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकीची जाण. दिसून येते. त्यांचा यूपीएससी परिक्षेचा प्रवास पुण्यातून सुरु झालेला आहे.

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख