राष्ट्रवादीच्या नेत्यांशी सूर न जुळलेले दत्तात्रेय भरणे कंपूशाहीत अडकले

मराठ्यांचा पक्ष म्हणून हिणवल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून धनगर समाजाच्या दत्तात्रेय भरणे यांनी हा चमत्कार घडविला.
Guardian Minister Dattatreya Bharne was stuck in a certain class in Solapur
Guardian Minister Dattatreya Bharne was stuck in a certain class in Solapur

सोलापूर : राज्यात ज्या व्यक्तींच्या नशिबात प्रचंड राजयोग होता, त्या व्यक्तींमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. हर्षवर्धन पाटील यांना आतापर्यंत 19 वर्ष आमदारकी मिळाली. जेवढे दिवस आमदारकी तेवढे दिवस मंत्रीपद (काही महिन्यांचा अपवाद) असे एकमेव उदहारण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. राजकारणासाठी आवश्‍यक असलेल्या सर्वच गोष्टी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे होत्या. दत्तात्रेय भरणे यांच्याकडे मात्र त्यातुलनेत फारसे काहीच नव्हते. तरीही भरणे यांनी पाटील यांना दोन वेळा पराभूत केले. मराठ्यांचा पक्ष म्हणून हिणवल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून धनगर समाजाच्या दत्तात्रेय भरणे यांनी हा चमत्कार घडविला. सहज साध्य नसलेला हा चमत्कार घडविण्यात भरणे यांचा इंदापुरातील अनलिमिटेड स्वभाव महत्वाचा मानला जातो. इंदापुरात अनलिमिटेड असलेले दत्तात्रेय भरणे हे सोलापुरात मात्र लिमिटेडच झाले आहेत. (Guardian Minister Dattatreya Bharne was stuck in a certain class in Solapur)
 
पालकमंत्री भरणे यांना मंत्रीपदाची पहिल्यांदा जबाबदारी मिळाल्यानंतर सोलापूरसारख्या महत्वाच्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचीही जबाबदारी त्यांना मिळाली. पालकमंत्री भरणे सध्या सोलापूर शहर व जिल्ह्यातील ठराविक वर्गात अडकले आहेत. इंदापुरातील त्यांचा अनलिमिटेड स्वभाव हा सोलापुरात आल्यावर मात्र लिमिटेड होताना दिसत आहे. 

माढ्यातून तब्बल सहा वेळा आमदारकी भूषवणारे बबनराव शिंदे असोत की मतदारसंघ राखीव होण्यापूर्वी व मतदारसंघ राखीव झाल्यानंतर तब्बल सहावेळा शरद पवार यांच्या विचाराचा आमदार निवडून आणणारे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील असोत, राष्ट्रवादीच्या या ज्येष्ठ नेत्यांसोबत पालकमंत्री भरणे यांची जवळीक दिसत नाही. तसाच अनुभव पहिल्या टर्मचे आमदार संजय शिंदे असोत की इंदापूरवासी असलेले परंतु, मोहोळमधून आमदार झालेले यशवंत माने यांच्या बाबतीतही येत आहे. शरद पवार यांचा पठ्ठ्या म्हणून ओळख असलेले पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके यांचीही पालकमंत्री भरणे यांच्यासोबत फारशी जवळीक असल्याचे या जिल्ह्याने पाहिले नाही. 

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी ज्या नेत्यांवर उभा आहे. त्यांच्यासोबत तरी किमान पालकमंत्री भरणे यांचे सूर जुळायला हवेत. पालकमंत्री भरणे सोलापुरात येतात आणि ठराविकच राजकीय अथवा बिगर राजकीय लोकांना भेटून जातात किंवा त्यांच्या भेटीसाठी ठराविकच राजकीय किंवा बिगर राजकीय लोक का येतात? याबद्दल विचार होणे आवश्‍यक आहे. पालकमंत्री भरणे यांचा सोलापुरातील अनलिमिटेड स्वभाव सोलापूरच्या राष्ट्रवादीला भविष्यात मारक ठरण्याची शक्‍यता आहे. 


बिगर मराठा मंत्रीही यशस्वी होऊ शकतो, हे देशमुखांनी दाखवून दिले


राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे असोत की शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील असोत, सोलापूर बाजार समितीमध्ये असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे काम करणाऱ्या संचालकांना माजी पालकमंत्री व भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे नेतृत्व विश्वासार्ह वाटू लागले आहे. राजकारणात काम करताना जातीचा मुद्दा फारसा लागू होत नाही. तुमची वागणूक आणि स्वभाव चांगला असेल, तर तुम्ही जातीचा मुद्दा खोडून काढू शकता, याचे उत्तम उदाहरण आमदार विजयकुमार देशमुख यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री व बाजार समितीचे सभापती म्हणून काम करताना दिले आहे.

ग्रामीण भागात निर्णायक असलेल्या मराठा समाजातील अनेक नेते तेव्हा (देशमुख पालकमंत्री असताना) आणि आताही (राज्यात सत्ता नसताना) आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासोबत राहिले आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात बिगर मराठा मंत्रीही यशस्वी होऊ शकतो, हे दाखवून देण्यात माजी मंत्री, आमदार विजयकुमार देशमुख यांना जसे जमले तसे पालकमंत्री भरणे यांना का जमत नाही? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com