राहुल कुल यांनी आग्रह करताच फडणवीसांनी केला दौऱ्यात बदल

दौरा नियोजित नसताना कुल यांच्या निवासस्थानी फडणवीस यांनी अचानक भेट दिल्याने कार्यकर्त्यांची एकच गडबड उडाली.
Devendra Fadnavis visited Rahul Kul's house
Devendra Fadnavis visited Rahul Kul's house

केडगाव (जि. पुणे) : देवेंद्रजी, आपण उद्‌घाटन केलेल्या दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथील कोविड सेंटरमधून तब्बल १८०० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. याचे संपूर्ण संयोजन ही मंडळी करीत आहेत. आमदार राहुल कुल यांनी सेंटरच्या कामकाजाचे श्रेय कार्यकर्त्यांना दिले. वास्तविक या सेंटरमागे कुल यांनी संपूर्ण ताकद उभी केली आहे. मात्र, त्याचे श्रेय त्यांनी स्वतःकडे घेतले नाही. मी जरी चेहरा असलो तरी सेवेसाठी कार्यकर्त्यांचे राबणारे शेकडो हात यामागे आहेत, असे त्यांनी नमूद केले. (Devendra Fadnavis visited Rahul Kul's house)

आमदार राहुल कुल यांनी राहू (ता. दौंड) येथे आपल्या कार्यकर्त्यांची देवेंद्र फडणवीस यांना ओळख करून दिली. पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सांगोल्याचे माजी आमदार (कै.) गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले होते. बार्शी येथे भाजपचे सहयोगी आमदार राजेंद्र राऊत यांच्या मुलांच्या विवाह सोहळ्यास जाता न आल्याने ते काल राऊत कुटुंबीयांना भेटले आणि नवदांपत्यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

बार्शीतील कार्यक्रम उरकून देवेंद्र फडणवीस हे विमानाने सायंकाळी मुंबईला रवाना होणार होते. परंतु अचानक कार्यक्रमात बदल होत फडणवीस यांनी आमदार राहुल कुल यांच्या आग्रहावरून कुल यांच्या राहू (ता. दौंड) येथील निवासस्थानी भेट दिली. या वेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते. 

कुल परिवाराच्या वतीने आमदार राहुल कुल, माजी आमदार रंजना कुल व भाजपा महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुल यांनी उपस्थितांचे आदरातिथ्य केले. दौरा नियोजित नसताना कुल यांच्या निवासस्थानी फडणवीस यांनी अचानक भेट दिल्याने कार्यकर्त्यांची एकच गडबड उडाली. पाहुणचार झाल्यानंतर सत्कार व फोटोसेशन सुरू झाले. 

एवढ्यात आमदार कुल यांची नजर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे कोविड सेंटर चालवणाऱ्या समन्वयकांवर गेली. उपस्थित असलेले समन्वयक विकास शेलार , तुकाराम ताकवणे यांना आमदार कुल यांनी पुढे बोलावले. देवेंद्र फडणवीस यांना ‘तुम्ही उद्‌घाटन केलेले डेडिकेटेड कोविड सेंटर ही मंडळी चालवतात,’ असे सांगितले. यामध्ये विकास शेलार हे जिल्हा परिषदेचे शिक्षक असल्याचा आमदारांनी आवर्जून उल्लेख केला. हे ऐकताच फडणवीस यांनी स्मितहास्य करीत नमस्कार केला व समन्वयकासोबत फोटोसेशन केले. 

आमदार कुल यांनी कोविड सेंटर चालवल्याचे श्रेय समन्वयक डॉक्टर डी.जे. वाघमोडे, डॉक्टर मनोज लडकत, डॉ. अनिकेत खळदकर, डॉ प्रतिक मोरे, डॉ दीपक जाधव, डॉ कोमल मोरे, डॉ शुभांगी दिवेकर, डॉ कविता देवकाते तसेच भाजपचे तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, विकास शेलार, तुकाराम ताकवणे, दिनेश गडधे, प्रा. अशोक दिवेकर, आबा चोरमले तसेच नर्स व सेविकांना दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com