प्रणिती यांच्या मंत्रिपदास अडथळा नको; म्हणून सुशीलकुमार शिंदेंनी सिद्धाराम म्हेत्रेंना पाडले

ताई एकदा सोलापूर शहर मध्य मतदारसंघ सोडून शहर उत्तर मतदारसंघामध्ये घुसूनच बघा.
Former Minister Laxman Dhoble's serious allegations against senior leader Sushilkumar Shinde
Former Minister Laxman Dhoble's serious allegations against senior leader Sushilkumar Shinde

सोलापूर : ‘‘आपल्या विरोधातील उमेदवार कोण असावा, हे कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हेच ठरवत असत. राज्याच्या मंत्रिमंडळात आपल्या मुलीला अडचण होईल; म्हणून अक्कलकोटचे सिद्धाराम म्हेत्रे यांनाही त्यांनीच पराभूत केले,’’ असा खळबळजनक आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी ज्येष्ठ नेते शिंदे यांच्यावर केला. (Former Minister Laxman Dhoble's serious allegations against senior leader Sushilkumar Shinde)

आमदार प्रणिती शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी भाजप नेत्यांवर उजनी धरणाच्या दुसऱ्या पाईपलाइनवरून टीका केली होती. तसेच आगामी काळात शहर उत्तरमध्ये कॉंग्रेस पक्षाची ताकद दाखवून देऊ, असा इशारा दिला होता. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक भवनाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात ढोबळे यांनी वरील उत्तर दिले. या वेळी त्यांनी कॉंग्रेसवर विशेषत: सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.

भाजप नेते लक्ष्मण ढोबळे म्हणाले की, ताई एकदा सोलापूर शहर मध्य मतदारसंघ सोडून शहर उत्तर मतदारसंघामध्ये घुसूनच बघा. नक्कीच मदत होईल. मतदारसंघच बदलून टाका. एकदा लढाई होऊन जाऊद्याच. नुरा कुस्ती करणाऱ्यांनी राजकारणावर बोलू नये, असे म्हणून त्यांनी थेट ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

आपल्या विरोधातील उमेदवार कोण असावा, हेही सुशीलकुमार शिंदे हेच ठरवत असत. तसेच, मंत्रिमंडळात आपल्या मुलीला अडचण होईल; म्हणून अक्कलकोटचे सिद्धाराम म्हेत्रे यांनाही सुशीलकुमार शिंदे हेच पराभूत करतात, असा घाणाघाती आरोपही ढोबळे यांनी यांनी यावेळी बोलताना केला.

भाजपला मी चॅलेंज करते, केंद्रात त्यांची सत्ता असून मोदीबाबा पंतप्रधान आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांनी उजनी धरणावरून दुसऱ्या पाईपलाईनचे काम पूर्ण करून दाखवावे, असे आव्हान प्रणिती शिंदे यांनी भाजप नेत्यांना दिले होते. त्यावर बोलताना ढोबळे म्हणाले, ‘ताई आम्ही उजनी धरणावरून पाईपलाईनही करून दाखवू, तुम्ही फक्त वाढपी बदला. 

 
काय म्हणाल्या होत्या प्रणिती शिंदे?

कॉंग्रेसने आजवर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष दिले नाही. परंतु, आगामी निवडणुकांमध्ये या मतदारसंघातील कॉंग्रेसची ताकद निश्‍चितपणे दाखवू, असा इशारा आमदार प्रणिती शिंदे यांनी 'कॉंग्रेस मनामनात, कॉंग्रेस घराघरात' या मोहिमेचा  शुभारंभ करताना भाजपसह अन्य पक्षांतील नेत्यांना दिला होता.  

भाजपकडून सातत्याने केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका केली जाते. परंतु, शिंदे यांनी काय केले, केवळ उजनीचे पाणी आणले. उजनी, उजनी काय करताय, आहे का तुमच्यात हिम्मत दुसरी पाईपलाईन आणण्याची. किती वर्षे आम्ही दुहेरी पाईपलाईनचे नाव ऐकतो. त्यांचे दोन मंत्री, एक खासदार असतानाही त्यांना ते जमले नाही. भाजपला मी चॅलेंज करते, केंद्रात त्यांची सत्ता असून मोदीबाबा पंतप्रधान आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांनी हे काम पूर्ण करून दाखवावे, असे आव्हानही प्रणिती शिंदे यांनी भाजप नेत्यांना दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com