मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, निसर्गासमोर आपण हतबल!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगली येथे पूर परिस्थितीचाआढावा घेतला. या वेळी त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, निसर्गासमोर आपण हतबल!
chief minister uddhav thackeray meets flood affected peoples

सांगली : प्रचंड प्रमाणात पाऊस पडतोय, दरडी खचताहेत. निसर्गासमोर आपण हतबल आहोत. पुराच्या पाण्यामुळे पूल वाहून गेले तसेच, घाटरस्तेही खचले. नदी पात्रातल्या पूररेषेची अंमलबजावणी होत नसेल तर तिला काय अर्थ आहे. नदी पात्रांमध्ये अतिक्रमणे झाली आहेत, असा उद्वेग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगली येथे पूर परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आपत्तींची वारंवारता पाहिल्यास त्यांचे स्वरूप भीषण होताना दिसत आहे. प्रचंड प्रमाणात पाऊस पडतोय, दरडी खचताहेत. निसर्गासमोर आपण हतबल आहोत. पुराच्या पाण्यामुळे पूल वाहून गेले तसेच, घाटरस्तेही खचले. नदी पात्रातल्या पूररेषेची अंमलबजावणी होत नसेल तर त्यांना काय अर्थ आहे. नदी पात्रांमध्ये अतिक्रमणे झाली आहेत. ती दूर करावी लागतील. 

काही ठिकाणी वस्त्यांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. दरडग्रस्त ठिकाणी झालेली बांधकामेही नाईलाजाने दूर करावी लागतील. आपल्याला दोन गोष्टींवर काम करावे लागेल. आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत करण्यात येत आहे. सांगली प्रशासनाला नागरिकांनी चांगले सहकार्य केले. या संपूर्ण भागात काही लाख लोकांचे स्थलांतर झाले, त्यामुळे जीव वाचले. यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे अत्यंत महत्वाचे आहे, असे ठाकरे यांना सांगितले. 

पुराच्या पाण्याचे व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. दुष्काळग्रस्त भागाकडे पाणी वळवण्याचा सूचनाही केल्या आहेत. वडनेरे समितीसह सर्व समित्यांचे अहवाल एकत्र करून योग्य तो आराखडा तयार करण्यात येईल. तज्ज्ञांची समिती नेमण्याची गरज आहे. त्यात पूर व्यवस्थापन आणि दरडी कोसळण्याच्या कारणांवर उपाय शोधण्यात येतील. यापुढे विकासकामे करताना निसर्ग, पर्यावरण या अनुषंगाने भविष्यातील होणारा तोटा याचा विचार करावा लागेल. केंद्राने आता एनडीआरएफचे निकष सुधारावेत. व्यावसायिक, व्यापारी यांना विम्याची रक्कम महसूल विभागाच्या पंचनाम्यावर मिळावी, असेही त्यांनी सांगितले.  

मुख्यमंत्र्यांनी भिलवडी येथे पोचल्यानंतर बाजारपेठ परिसरात पूरग्रस्तांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, अतिवृष्टीचा अंदाज मिळाल्यापासून प्रशासनाचे काम सुरू होते. सांगलीच्या या भागात 4 लाख लोकांचे स्थलांतर करण्यात आले. लोकांचे आर्थिक व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जीवितहानी होऊ न देण्याला आमचे प्राधान्य आहे. या परिस्थितीवर तुमच्या सर्वांच्या साथीने मी मार्ग काढणार आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा लागणारे आहे. यासाठी कटू निर्णय घ्यावे लागतील. 

दरवर्षी पुराचे संकट येणार आणि त्यातून उभे राहणार की परत पुढच्या वर्षी तेच करणार? दरवर्षी पाण्याच्या पातळ्या मोजण्यात आपल्याला आयुष्य घालवायचे नाही.  काही झाले की लगेच पॅकेज जाहीर केले जाते परंतु, त्यातला पैसा कुठे जातो हेच कळत नाही. मला प्रामाणिकपणे तुमच्यासाठी काम करायचे आहे. घर- दार, शेती यांचे किती नुकसान झाले याची आकडेवारी घेत आहोत. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार म्हणून आपल्या हिताचे असेल तेच करणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका, असेही ठाकरे यांनी नमूद केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.