दिलासादायक : पर्यटनस्थळांवरील निर्बंध लवकरच होणार शिथिल

या निर्बंधामुळे स्थानिक व्यावसायिक, छोट्या-मोठ्या व्यावसायांवर मोठा परिणाम झाला आहे.
Restrictions on tourist destinations will be eased in eight days
Restrictions on tourist destinations will be eased in eight days

पिंपरी : पर्यटन स्थळांवरील कोरोना महामारीचे निर्बंध येत्या आठ दिवसांत शिथिल करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. २०) पुणे येथे बोलताना सांगितले. त्यामुळे पर्यटक आणि त्यावर अवलंबून असलेले स्थानिक छोटेमोठे व्यावसायिक यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Restrictions on tourist destinations will be eased in eight days)

मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरील कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्याची मागणी पुणे जिल्हा कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यावर पर्यटकांना कशा पद्धतीने मुभा देण्यात येईल, याबाबत येत्या आठ दिवसांत सकारात्मक निर्णय घेऊ, असे पवार यांनी सांगितले. 

या संदर्भात आमदार शेळके म्हणाले की, कोरोना महामारीमुळे सध्या पर्यटन स्थळांवर बंदी आहे. त्यामुळे पर्यटकांवर आधारित लहान-मोठ्या व्यवसायांवर विपरीत परिणाम झाला आहे. स्थानिक व्यावसायिक मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहेत. त्यामुळे पर्यटन स्थळांवरील हे नियम शिथिल करून स्थानिक व्यावसायिकांना दिलासा देण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठकीत केली. 

पुणे जिल्ह्यासह मावळ तालुक्यात हजारो पर्यटक येत असतात. पर्यटनाचा तेथील स्थानिक अर्थकारणात मोठा वाटा आहे. त्यामुळे अनेकांना उपजिविकेचे विविध पर्याय उपलब्ध झालेले आहेत. मात्र, कोरोना महामारीच्या या निर्बंधामुळे स्थानिक व्यावसायिक, छोट्या-मोठ्या व्यावसायांवर मोठा परिणाम झाला आहे, हे बैठीकत अजित पवार यांना पटवून दिले, असेही शेळके यांनी नमूद केले. 

एकंदरीतच मोठ्या अर्थकारणाला खिळ बसली आहे. व्यावसायिक अडचणीत आले आहेत. ऐन पावसाळ्यात पर्यटनास बंदी असल्याने अनेकांना उत्पन्नाचा स्त्रोत राहिलेला नाही. अनेक भागातील अर्थकारण हे पर्यटन, पर्यटकांवर अवलंबून आहे. त्यामुळे याबाबत लवकर निर्णय होणे गरजेचे आहे. त्यात आता जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भावही कमी होताना दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com