आमदार गोरे, खोतांनी शर्यतीचे ठिकाण बदलले...रातोरात निरोप गेले...अन्‌ पहाटे बैलगाडा शर्यती झाल्या!

आमदार पडळकरही माळा-माळाने अर्धा तास पायपीट करत मैदानस्थळी पोचले.
Bullock cart races were held at Vakshewadi ground
Bullock cart races were held at Vakshewadi ground

आटपाडी : कडेकोट पोलिस बंदोबस्त आणि झरे परिसरातील आठ गावांत संचारबंदी लावूनही आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यती घेतल्याच. आमदार सदाभाऊ खोत आणि माणचे आमदार जयकुमार गोरे हे गुरुवारी (ता. १९) रात्री झरे येथे दाखल होत शर्यतीसाठीची नियोजन करण्यात आले. त्यांनी रातोरात शर्यतीचे ठिकाण बदलले. रात्रीतच वाक्षेवाडीच्या पठारावर मैदान बनवले. शर्यतीसाठी आलेल्या गाडीवाल्यांना पहाटे पठारावर येण्याचे निरोप गेले. आमदार पडळकरही माळा-माळाने अर्धा तास पायपीट करत मैदानस्थळी पोचले आणि पहाटेच बैलगाड्या शर्यती पार पडल्या.(Bullock cart races were held at Vakshewadi ground)

दरम्यान, आज झालेल्या शर्यतीत सागर-आनंद बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला. त्याचा बक्षीस प्रदान समारंभही मान्यवरांच्या हस्ते झाला. आटपाडीत गेली आठवडाभर बैलगाडा शर्यतींचा विषय तापला होता. सांगली जिल्हा प्रशासनाकडून शर्यती घेऊ नयेत, यासाठी सर्व प्रयत्न सुरु होते. मात्र, आमदार गोपीचंद पडळकर यांनी शर्यती होणारच, अशी भूमिका घेतल्यानंतर वातावरण तापले होते. 

आमदार गोपीचंद पडळकर यांनी बंदीचा आदेश झुगारून झरे येथे बैलगाडी शर्यतीच्या मैदाचे आयोजन केले होते. पण, शर्यत होऊ नये; म्हणून पोलिसांनी झरे येथील मैदान उद्‌ध्वस्त केले होते. पंचक्रोशीत कडक पोलीस बंदोबस्त ठेवून संचारबंदी लागू केली होती. जागोजागी नाकाबंदी केली होती. मात्र, काल आमदार सदाभाऊ खोत, माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी झरे येथे दाखल होत शर्यतीसाठीची नियोजन केले. शर्यतीचे ठिकाणच रात्रीत बदलण्यात आले. 

वाक्षेवाडीच्या पठारावर शर्यतसाठी मैदान बनविण्यात आले. शर्यतीसाठी काल आलेल्या गाडीवाल्यांना पहाटे सहा वाजता पठारावर येण्याचे निरोप कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पाठवले गेले. त्या दरम्यान शेकडो शौकीन शर्यतीच्या स्थळी दाखल झाले होते. आमदार पडळकर हे माळामाळावरून अर्धा तास पायपीट करत मैदानस्थळी पोचले. सात बैलगाड्यांनी शर्यतीत सहभाग घेतला. सागर-आनंद बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला. सूर्योदयाआधीच शर्यती पार पडल्या होत्या. विजेत्या बैलगाडी मालकांना रेस्ट हाऊसवर लाखांचे बक्षीस देण्यात आले. तेथे हजारो तरूणांनी जल्लोष केला. 

पोलिसांना शर्यतीचे ठिकाण कळेपर्यंत उशीर झाला

मैदान बदलल्याची बातमी एव्हाना पोलिसांना आदल्या दिवशीच समजली होती. सकाळी ठिकाण कळाले, तेव्हा वेळ झाला होता. त्या ठिकाणापर्यंत पोचेपर्यत पोलिसाची मोठी धांदल उडाली होती. ते मैदानावर पोचले तेव्हा शेकडोंच्या संख्येने तरुण उपस्थित होते. त्यामुळे जमावापुढे पोलिसही शेवटी हतबल झाले.


....म्हणून शर्यती भरवल्या : पडळकर

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोचाव्यात, यासाठी ही शर्यत घेतली. आता यापुढे बंदी न उठल्यास राज्यभर आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी या वेळी बोलताना दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com