दोन खूनांच्या घटनांनी पिंपरी-चिंचवड शहर हादरले...

जवळच्या व्यक्तींकडूनच खून झाल्याची घटना...
दोन खूनांच्या घटनांनी पिंपरी-चिंचवड शहर हादरले...
Pimpri-Chinchwad city two Murder (2).jpg

पिंपरीः दोन खूनांच्या घटनांनी सोमवारी (ता.६) पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हादरले. पहिल्या घटनेत मोशी येथे प्रेमविवाह झालेल्या तलाठ्याने आपल्या डॉक्टर पत्नीची चारित्र्याच्या संशयावरून हत्या केली. तर, दुसऱ्या घटनेत चाकण (ता.खेड,जि.पुणे) येथे बहिणीची छेड काढली म्हणून १६ वर्षाच्या मुलाचा निर्घुण खून करण्यात आला. या मुलाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून नंतर दगड टाकण्यात आला. तर, तलाठ्यानेही आपल्या पत्नीच्या डोक्यात हातोड्याने घाव घालून तिचा खून केला.

विजयकुमार गजानन साळवे असे आरोपी तलाठ्याचे, तर डॉ. सरला असे त्याच्या पत्नीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वी त्यांचा प्रेमविवाह झाला होता. डॉ. सरला या पुण्याच्या नायडू रुग्णालयात कामास होत्या. तर, त्यांचा खून करून फरार साळवे हा जुन्नर तालुक्यात आळेफाटा येथे तलाठी आहे. त्यांनी नुकताच बोराडेवाडी, मोशी येथील युटोपिया या टॉवर सोसायटीच्या नवव्या मजल्यावर नवा फ्लॅट घेतला होता. त्याची वास्तूशांती शनिवारी (ता.४) होती. त्याच दिवशी हा खून झाल्याचा अंदाज भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांत्यानी व्यक्त केला आहे. तसेच, पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून आऱोपीने तो केला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आरोपी फरार झाला आहे. त्याचा कसून शोध सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

साळवे दांपत्यांचा कॉमन मित्र असलेल्या मित्राने या दोघांना फोन केले असता ते बंद लागले, म्हणून तो त्यांच्या घरी गेला. त्यावेळी त्याला बंद घराबाहेर डॉ. सरला यांच्या चपला दिसल्या. तर, खाली त्यांच्या पतीची गाडी दिसली नाही. म्हणून त्यांना संशय आला. त्यांनी याबाबतची  माहिती पोलिसांना दिली. डुप्लीकेट चावीने पोलिसांनी दरवाजा उघडला असता बेडरुममध्ये डॉ. सरला रक्ताच्या थारोळ्यात आढळल्या.

दुसऱ्या घटनेत, तर काल (ता.६) भरदिवसा चाकण मार्केट यार्डाच्या मैदानात रोहित प्रभू सहानी या १६ वर्षाच्या मुलाचा सातजणांच्या टोळक्याने खून केला. खून करणारे टोळके हे विशीतील आहे. त्यातील अराफत वाजीब शिकीलकर याच्या बहिणीची रोहितने छेड काढली होती. त्याचा राग मनात धरून त्याने आपले युसूफ अर्शद काकर (वय २०), करन पाबळे,  हुजेब असिफ काकर, निहाल इनामदार, मन्सूर इनामदार आणि सोहेल इनामदार यांच्या मदतीने रोहितचे अपहरण केले.  नंतर त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. अराफतने लोखंडी रॉडने रोहितच्या डोक्यात प्रहार केला. तर युसूफने डोक्यात दगड घातला. युसूफला चाकण पोलिसांनी अटक केली असून इतर आऱोपींचा शोध घेत आहेत

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in