आशिष शेलार म्हणतात... जाऊ द्या ना सुप्रिया ताई.. नाहीतर.. - BJP leader Ashish Shelar criticizes Supriya Sule | Politics Marathi News - Sarkarnama

आशिष शेलार म्हणतात... जाऊ द्या ना सुप्रिया ताई.. नाहीतर..

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

गुंडांबाबत काही समस्या असल्यास कधीही फोन करा. मला इंटरनॅशनल डॉन ओळखतात, असे वक्तव्य करणारे भाजपचे नेते गणेश नाईक यांनी केले होते. 

मुंबई : गुंडांबाबत काही समस्या असल्यास कधीही फोन करा. मला इंटरनॅशनल डॉन ओळखतात, असे वक्तव्य करणारे भाजपचे नेते गणेश नाईक यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी मुंबईत केली होती. वाशी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका. 

संरक्षणासाठी वीज कर्मचार्यांचा 'मनसे'ला रामराम!

शेलार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, गणेश नाईक यांच्या भाषणातील विधानाची एसआयटी चौकशी करायची तर मग, तसे बरेच विषय आहेत.
आझाद काश्मीरचा बोर्डवाली मेहक प्रभू, शर्जिल, त्याला पळून जायला मदत करणारे..पूजा चव्हाणचा मृत्यू..अशा ट्रकभर "एसआयटी" कराव्या लागतील. जाऊ द्या ना ताई! नवी मुंबईत भाजप जिंकणार हे जनतेनेच ठरवलंय! अशी टीका त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली आहे. 

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे? 

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना ओळखणाऱ्या या नेत्यामुळे देशातील आणि नवी मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील एकाद्या आमदाराचे संबंध अशा लोकांशी असतील आणि त्याची जाहीर कबुली ते भरसभेत देत असतील, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांची तातडीने चौकशी लावावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली होती. 

मलईदार विषयात काँग्रेस, शिवसेनेची युती कशी होते... शेलारांचा टोला

तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पारदर्शकपणे महाराष्ट्रातील जनतेला याचे उत्तर द्यावे. कारण नागरिकांची सुरक्षा ही माझी नैतिक जबाबदारी आहे, असे सुळे म्हणाल्या होत्या. येत्या संसदेच्या अधिवेशनात हा विषय मांडणार असून नाईक यांच्या चौकशीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख