संरक्षणासाठी वीज कर्मचा-यांचा `मनसे`ला रामराम ! - Electrick employee leave MNS for protection. MNS Politics | Politics Marathi News - Sarkarnama

संरक्षणासाठी वीज कर्मचा-यांचा `मनसे`ला रामराम !

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शहरात संघटनात्मक बांधणीसाठी धडपड सुरु आहे. विविध पदाधिकारी बेरजेचे राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र त्याला छेद देत वीज कामगारांच्या संघटनेतील अनेक पदाधिका-यांनी  सदस्यांसह मनसेला राम राम ठोकला आहे. हा मनसेला मोठा धक्का मानला जात आहे.

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शहरात संघटनात्मक बांधणीसाठी धडपड सुरु आहे. विविध पदाधिकारी बेरजेचे राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र त्याला छेद देत वीज कामगारांच्या संघटनेतील अनेक पदाधिका-यांनी  सदस्यांसह मनसेला राम राम ठोकला आहे. हा मनसेला मोठा धक्का मानला जात आहे. 

येथील महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेत प्रवेश केला आहे . त्यामुळे येथील मनसे कामगार संघटनेला मोठे खिंडार पडले आहे. महत्वाचे पदाधिकारी व कार्यकर्ते संघटना सोडून गेल्याने या संघटनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 
 
नाशिक रोड येथील मंजुळा मंगल कार्यालयात गुरुवारी हा प्रवेश सोहळा पार पडला. नागोराव मगर, सय्यद जहिरोद्दीन  यांच्या नेतृत्वाखाली  भाऊसाहेब भाकरे, के. वाय. बगड, रघुनाथ लाड, मिलिंद दंडगव्हाळ, डि.के. जाधव,  संजय उगले. विनोद अहिरे आदींच्या उपस्थितीत मनसेचे महत्वाचे नेते गिरीश जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने मनसे वीज कामगार सेनेला सोडचिठ्ठी दिली. या पदाधिकारी व सभासदांनी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेत प्रवेश केला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंता रंजना पगारे , अधीक्षक अभियंता प्रवीण दरोजी, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी राजे भोसले आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एन. के. मगर होते . 

कामगारांच्या हितासाठी सर्वांनी संघटित होऊन काम करणे आवश्यक आहे. कामगारांचे अनेक प्रश्न गंभीर बनले आहेत. त्यावर सातत्याने प्रयत्न करूनही काहीही प्रतिसाद व तोडगा निघालेला नाही. पेट्रोल अलाउन्स, लोकसेवक दर्जा मिळणे , पगारवाढीची थकित हप्त्याची रक्कम मिळवून देणे, उत्तम दर्जाचे टूल किट साहित्य, उत्तम दर्जाचा गणवेषाचे कापड आदी विविध मागण्यांसाठी प्रयन्त केले जाणार आहेत. त्यासाठीच नव्या संघटनेत प्रवेश केल्याचे या पदाधिकारी व कर्मचा-यांनी सांगितले. 

वीज वसुलीसाठी सरंक्षण 
महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी विविध मागण्या सादर केल्या आहेत. यामध्ये  प्रामुख्याने कोरोना काळात वीज कामगारांनी जिवाची पर्वा न करता 24 तास काम केले. मात्र सध्या वीज वसुली करणाऱ्या कामगारांवर हल्ले केले जात आहेत. त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. त्यांना संरक्षण मिळावे ही मुख्य मागणी यावेळी करण्यात आली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख