मलईदार विषयात काँग्रेस, शिवसेनेची युती कशी होते...शेलारांचा टोला - BJP leader Ashish Shelar targets Mahavikas Aghadi government | Politics Marathi News - Sarkarnama

मलईदार विषयात काँग्रेस, शिवसेनेची युती कशी होते...शेलारांचा टोला

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

समुद्राचे पाणी गोड करण्याच्या प्रस्तावावरून शेलारांनी शिवसेनेची खिल्ली उडविली आहे.

मुंबई : भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. समुद्राचे पाणी गोड करण्याच्या प्रस्तावावरून शेलारांनी शिवसेनेची खिल्ली उडविली आहे.

याबाबत शेलार यांनी टि्वट केले आहे. आपल्या टि्वटमध्ये शेलार म्हणतात की समुद्राचे पाणी गोडे करण्यासारखे मोठे प्रस्ताव आले की शिवसेनेसोबत मिलीभगत कशी होते ? नालेसफाई, एसटीपी पासून मलईदार विषयात काँग्रेस, शिवसेनेची युती कशी होते? उजेडात सुरु असलेल्या या तुमच्या काँग्रेसी "रवीराज"चे सत्यशोधन आता आम्ही करु जनतेसमोर ! “नाचता येईना अंगण वाकडे”

आशिष शेलार म्हणाले, "गेल्या महापालिका निवडणुकीत मुंबईत भाजपाला वाँर्ड रचनेमुळे मोठे यश मिळाले, असा जावई शोध चार वर्षांनी काँग्रेसच्या सत्यशोधन समितीने लावला? सत्यच शोधायचे तर मग 40 नगरसेवक असताना महापालिकेत विरोधीपक्ष नेतेपद कसे मिळाले? सरकारमध्ये मांडीला-मांडी लावून आणि पालिकेत विरोधात कसे?

हेही वाचा : संजय राठोड यांच्या समर्थनार्थ शिवसेना रस्त्यावर...
हिंगोली : हिंगोली जिल्हा परिषदेच्या मैदानावर शिवसेनेचे नेते तथा वन मंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ बंजारा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे, या मोर्चात सहभागी होण्यासाठी शिवसेना नेते,  आमदार संतोष बांगर हे देखील पुढे आले आहेत, मंत्री राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर शिवसेना पहिल्यांदाच या मोर्चाच्या निमित्ताने रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहे. "पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी कुणालाही पाठिशी घालणार नाही. या प्रकरणाची चैाकशी पोलिस करीत आहेत. त्यांना चैाकशी वेळ दिला पाहिजे. या तपासात राजकीय हस्तक्षेप नाही, " असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सांगितले. पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांनी कुठलाही आरोप केला नाही. त्यामुळे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दबावात येऊ नये आणि कुठलाही निर्णय घेऊ नये. तसेच संजय राठोड यांनी याठिकाणी आपल्या कुटुंबासह येऊन येथील विकास कामांचा आढावा घ्यावा. धर्मपिठाधीश्‍वर बाबूसिंग महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थान ट्रस्टी अध्यक्ष कबिरदास महाराज, सुनील महाराज यांच्यासह बंजारा समाजाच्या सर्व संत महंतांनी चर्चा केली.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख