ठाकूर पिता-पुत्रांच्या खेळीमुळे खारघरमध्ये शेकापला घरघर 

या काळात केंद्रात मोदींचे सरकार झाले. आमदार हे भाजपमय झाले.
Time to find existence on the shetkari kamgar Party in Kharghar
Time to find existence on the shetkari kamgar Party in Kharghar

खारघर : खारघर ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे पालिका निवडणुकीत पानीपत झाले. गेल्या चार वर्षांत शेकापच्या बहुतांश कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केल्यामुळे खारघरमधून शेकाप लवकर हद्दपार होण्याचा मार्गावर आहे. (Time to find existence on the shetkari kamgar Party in Kharghar)

खारघर शहराची निर्मिती होत असताना खारघर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामपंचायत हद्दीतील गावांत नागरी सुविधा पुरविल्या जात असे. हळूहळू गावाचे शहरात रूपांतर झाले. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 2014 मध्ये शेकाप आघाडीचे सर्व उमदेवार निवडून आले होते. त्यामुळे खारघरमध्ये शेकापचे वर्चस्व होते. खारघर ग्रामपंचायत ही पनवेल पालिका हद्दीतील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखले जात असे. त्यावेळी सत्ताधारी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून गावाबरोबरच खारघर वसाहतीमधील सोसायटी पेव्हर ब्लॉक, बोअरवेल, मागासवर्गीय आणि अपंग व्यक्तींना लाभ दिला. मात्र, नागरिकांची मने जिंकता आले नाहीत. 

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गाव आणि वसाहतीत कोट्यवधी रुपयांचे कामे झाले. झालेली कामे दर्जेदार नसल्यामुळे आणि ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा नागपूर अधिवेशनात आला. संधी साधून रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर हळूहळू कार्यकर्ते जोडण्याचे काम करीत असताना खारघरमध्ये मॅरेथॉनच्या माध्यमातून प्रत्येक सोसायटीपर्यंत पोचले. या काळात केंद्रात मोदींचे सरकार झाले. आमदार हे भाजपमय झाले. त्यामुळे 2017 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपने शेकापचा दारुण पराभव केला. त्यानंतर शेकाप सावरलेच नाही. 

दरम्यान पालिका निवडणुकीत पराभूत झालेले शेकापचे माजी सरपंच संजय घरत, सीमा रमेश खडकर, सोमनाथ म्हात्रे यांच्यासह इतर काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच, कोपरा गावातील माजी उपसरपंच गुरुनाथ गायकर यांना शेकापने पालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली. मात्र, नुकताच त्यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी कामोठे येथील गणेश कडू यांची निवड करण्यात आली.

खारघर वसाहतीत अशोक गिरमकर, अजित अडसूळ, अशोक मोरे तर कोपरा गावात संतोष तांबोळी, संतोष गायकर, दिलीप ठाकूर, मुर्बी गावातील माजी जिल्हा परिषद सदस्य राम करावकर आदी बोटावर मोजण्यासारखे कार्यकर्ते शेकापमध्ये दिसून येत आहेत. पालिकेत पराभव झाल्यानंतर शेकापला सावरायला एकही पदाधिकारी समोर आलेले नाही.


महाआघाडीच्या माध्यमातून भाजपला टक्कर देणार

खारघरमधील काही शेकाप कार्यकर्त्यांना पक्षाच्या स्थितीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, शेकापकडे निवडणुकीसाठी राष्ट्रीय निवडणूक चिन्ह नाही. खारघर हे शहर झाले. त्यामुळे बाहेरून आलेल्या नागरिकांना शेकापचा इतिहास माहित नाही, त्यामुळे निवडणुकीत पराभव होतो. काही निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. मात्र, आगामी पालिका निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीत सहभागी होऊन शेकापच्या उमेदवारांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अथवा शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल. काहींनी शेकापच्या वरिष्ठ नेत्यांनी खारघरमधील कार्यकर्त्याच्या गाठीभेटी कमी झाल्या आहेत. विशेषतः कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वरिष्ठांकडे वेळ नाही. त्यात माजी आमदार विवेक पाटील हे कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी तुरुंगात आहेत. त्यामुळे खारघरमध्ये शेकापचे प्रमाण हळूहळू कमी होत असल्याचे सांगितले.

पालिकेवर झेंडा फडकवू

खारघरमधून शेकाप हद्दपार झाले नाही. शेकापला मानणारे कार्यकर्ते खारघरमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच, पुढील वर्षी होणाऱ्या पालिका निवडणुकीत आघाडीसोबत निवडणूक लढवून पालिकेवर झेंडा फडकवू, असे खारघरमधील पक्षाचे कार्यकर्ते संतोष तांबोळी यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com